जामा मस्जिद, राजुरा
दिनेश झाडे
मुख्य संपादक
राजुरा:-रमजान निमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने राजुरा शहरातील जामा मस्जिद येथे आयोजित केलेल्या दावते-ए-इफ्तारमध्ये शरीक झालो.

पवित्र रमजान महिण्यातील रोजा हे मुस्लिम धर्मीय बांधवांच्या धार्मिक भावनेशी जोडले असून त्यामागे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. सूर्योदयापासून तर सूर्यास्तापर्यंत होणारा उपवास म्हणजे मानवी संयमाचे द्योतकच आहे. या दिवसांत होणारे दावते-ए-इफ्तार हे सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असून इफ्तार पार्टीच्या माध्यमातून सर्व समाजातील नागरिक एकत्र येतात. सामाजिक सलोखा आणि एकोपा टिकण्यास मदत होते असे प्रतिपादन करीत सर्वांनी आपापसात बंधुता कायम ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असा सामाजिक संदेशही या कार्यक्रमातून दिला.

याप्रसंगी राजुरा जामा मस्जिद कमेटी व मुस्लिम समाज जामा मज्जिदचे मौलाना साबीर नुरी, ताजिम मोहम्मद नसीर, जामा मज्जित कमिटीचे अध्यक्ष राजीक कुरेशी, मुर्तुजा बेग, मतीन कुरेशी, जमील खान कुरेशी, मुजीब बेग, कलीम बेग, सय्यद बशीर, सय्यद इरफान, अब्दुल रहीम पटेल, मोहम्मद कासिम, जमील कुरेशी, मुनीर शेख, अझर काजी, सय्यद कुरेशी, बाबा बेग, अशीम कुरेशी, असलम चाऊस, सय्यद समीर, मैनू बेग, रुतफुल्ला बेग, सरपोद्दीन शहा, जफर पठाण, आसिफ सय्यद, करीम कुरेशी आदिंशी संवाद साधत हितगुज केली; त्याचबरोबर पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा ही दिल्या.

यावेळी माझ्यासमवेत भाजपचे तालुकाध्यक्ष सुनील उरकुडे, शहराध्यक्ष सुरेश रागीट, जिल्हा उपाध्यक्ष विनायक देशमुख, माजी नगराध्यक्ष विलास बोनगिरवार, पांडुरंग सा. चिल्लावार, प्रशांत गुंडावार, मिलिंद देशकर, वामन तुराणकर, राधेशाम अडानिया, सचिन डोहे, मंगेश श्रीराम, गणेश रेकलवार, नितीन वासाडे, प्रफुल घोटेकर, आकाश गंधारे, बाबा बेग, सागर भटपलीवार, प्रफुल कावळे, आसिफ सैय्यद, स्वप्नील पहानपट्टे, सचिन भोयर, अभिजित कोंडावार यांची उपस्थिती होती.

