⛔क्रांतीवीर बाबुराव शेडमाके आदिवासी गोंड समाज संघटनेचा उपविभागीय अधिकारी यांना प्रश्न
संपादक मुनिश्वर बोरकर गडचिरोली
चामॉर्शी – मौजे लगाम माल ता मुलचेरा येथील गट नं 168वर गैर आदिवासीं ने केलेला कब्जा हटवून मूळ आदिवासींना देण्यात यावा यासाठी आदिवासी युवा शेतकरी रमेश मडावी सतत शासन प्रशासन दरबारी पाठपुरावा करीत आहेत परंतू गैर आदिवासी हा महसूल विभागात पटवारी असल्यामुळे आदिवासी यांच्या अज्ञानाचा फायदा घेवुन व प्रशासनाची दिशाभूल करुण जमीन बळकावली असल्याचा आरोप निवेदनातून कऱण्यात आला आहे त्याचेच उदाहरण म्हणून मौजे लगाम माल ता मुलचेरा येथील अभिलेख नमूना पि -1 नुसार मूळ मालक शंकऱ्या वल्द धर्मा गोंड असताना गैर आदिवासी आनंद स्वामी सत्यनारायण गोविंदावर यांना वाटप कशी करण्यात आली असा प्रश्न निवेदनातून विचारला
सदर जमीनीचा अहवाल सादर करणे बाबत तहसीलदार मुलचेरा यांनी गठीत केलेल्या समितीने सादर केलेल्या अहवालात नमूद केले आहे की मौजे लगाम माल येथील जुना सर्व्ह न 158/2 चें अधीकार अभिलेखात अवलोकन केले असता सदर जमीन आनंद स्वामी सत्यनारायण गोविंदवार यांना वाटपात मिळाली परंतू आदिवासींची जमीन गैर आदिवासीं ना वाटप कोणत्या आधारावर केली त्याचे स्पष्ठकारण दिलेले नाही पुढें उक्त जुना सर्व्ह न ले पुनर्मोजणी नुसार 168 हा नवीन सर्व्ह पडला असून सातबाराच्या अवलोकन नुसार फेर फार क्रं 4दिनांक 14/3/1985 नुसार गैर आदिवासी आनंद स्वामी सत्यनारायण गोविंदवार यांचे नाव कमी करुण रमेश पांडुरंग मडावी यांचे अजोबा हनुमंता गोसाई मडावी यांचे नाव दर्ज करण्यात आले ते कायम ठेवून त्यांच्या वरसाचे नावे नोंदविणे अपेक्षित असताना तसे न करतां गैर आदिवासीं ची नोंद कऱण्यात आली गैर आदिवासीं हा महसूल विभागात पटवारी असल्यामुळे आदिवासी कायद्याचा गैर वापर करुण प्रशासनाची दिशाभूल व आदिवासी च्या अज्ञानाचा फायदा घेवुन आदिवासींची जमिन हडप करण्याचा प्रयत्न सुरु असून गैर आदिवासीं नी बळकावली जमीन मुळ आदिवासी ले देण्यात यावी अशी मागनी निवेदनातून केली जर तसे झाले नाही तर मोठ्या ना इलाजस्त्व पुन्हा आमरण उपोषण करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला यावेळी बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे क्रांतीवीर बाबुराव शेडमाके आदिवासी गोंड समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माणिकराव शेडमाके आदिवासीं युवा शेतकरी रमेश मडावी उपस्थितीत होते⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️

