राजेश येसेकर✍️ तालुका प्रतिनिधी भद्रावती
भद्रावती. : तालुक्यातील निप्पाण प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या जागेवर प्रकल्पग्रस्तांना विश्वासात न घेता ग्रेटा कंपनी पाठोपाठ न्यू ईरा कंपनीचे काम चोख पोलीस बंदोबस्तात सुरू करण्यात आले आहे. सदर कंपनीने प्रकल्पग्रस्तांच्या समस्या आधी मार्गी लावून नंतरच कामाला सुरुवात करावी त्याचप्रमाणे, या जागेवर काम करीत असताना परिसरातील पांदन तथा शिवरस्ते कायम मोकळे ठेवावे जेणेकरून परिसरातील शेतकऱ्यांना शेतात जाण्यास व मशागतीचे साहित्य शेतात नेण्यास अडचण येणार नाही अशी मागणी निप्पान प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीतर्फे तहसीलदारांना सादर करण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. प्रकल्पग्रस्तांना प्रति एकर 10 लाख रुपये अनुदान,नोकरीची हमी व कंपनी, प्रकल्पग्रस्त व एमआयडीसी यांच्यात त्रिपक्षीय करार करण्यात यावा अशी मागणी सदर प्रकल्पग्रस्तांची आहे. निवेदन सादर करताना निप्पान प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रवीण सातपुते,उपाध्यक्ष बंडू भादेकर, चेतन गुंडावर, सुरेश बदखल, रवी बोडेकर, बापूराव सोयाम, महेश बदखल, बाबा तराळे तथा अन्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

