संपादक मुनिश्वर बोरकर गडचिरोली
कुरखेडा:-नगर पंचायत कुरखेडा तर्फे इंजि. जनबंधु यांच्या देख रेख खाली सौर उर्जेचा नळाचे काम सुरू असुन रस्ता खोदकाम करून बाजुला येणारे नागरिकांचे जुने नळ उद्धवस्त करून रस्ता प्रवास बंदच पडला आहे. रस्त्यावर पोपडे पडलेले आहेत अश्या नगर पंचायत च्या भोंगळ कारभाराने कुरखेडा ची जनता त्रस्त झालेली आहे.

आंबेडकर वार्ड क्र. ४ मधे सौर ऊर्जा नळ कनेक्शन साठी खोदकाम सुरु असुन रस्त्याजवळ येणारे प्रमोद सरदारे यांचा नळ तोडफोट करून ही सरदारे यांनी सौर उर्जेचे नळ कनेक्शनसाठी अर्ज करूनही त्यांना नळ कनेक्शन देणार नाही असे उद्धट उतर इंजि. जनबंधु यांनी दिले अश्या अनेक लोकांचे नळ कनेक्शनची तोडफोट करून रस्त्यावर खंड्डे पडले असुन खोदकामातील तुकडे रस्त्यावर इतरत्र फेकल्या गेल्यामुळे न .प कडून पर्यावरणाचा दुरुपयोग होत आहे. सदर रस्यावरून सायकल स्वार जावू शकत नाही तर टु व्हिलर ची काय गत असावी. तोडफोड केलेले नळामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झालेली आहे. जेसीबी ने खोदकाम सुरू असल्यामुळे रस्त्यादी दैनिय अवस्था झालेली आहे.
आमच्या प्रतिनिधींनी इंजि. जनबंधु यांचेसी संपर्क साधला असता फोन उचलला नाही
