✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक

गडचांदूर:- औद्योगिक नगरी असलेल्या गडचांदूर शहरातील नावाजलेले चौक म्हणजे गांधी चौक. या चौकात सण- समारंभ, सामाजिक कार्यक्रम, राजकीय कार्यक्रम होत असतात. शहराला दिशा देण्याचे काम या चौकातून होते. परंतु प्रसिद्ध असलेल्या गांधी चौकात नावाचे फलक नव्हते. ही बाब लक्षात घेऊन शहरातील युवकांनी एकत्र येत महाशिवरात्रीच्या दिवशी फलक लावून गावचे शेतकरी मा .श्री . रामचन्द्र पाटिल ताजने याच्या हस्ते फलकाचे लोकार्पण केले.
यावेळी न. प. चे माजी उपाध्यक्ष शरद जोगी, मनोज भोजेकर,वैभव गोरे, निखिल एकरे,मयुर एकरे , रितिक चौधरी,वैभव किन्हेकर,चेतन पाडे, बंडू चौधरी यांचेसह युवक उपस्थित होते.
