जातीयवादी शक्ती बरोबर कधिही जाणार नाही:आमदार विजयभाऊ वडेट्टिवार
✍️मुनिश्वर बोरकर
संपादक
मुंबई:-माजी विरोधी पक्ष नेते कांग्रेसचे आमदार विजयभाऊ वडेट्टिवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेश ?अजित पवार गट , चर्चा बाबत पत्रकारांना प्रतिक्रिया देतांना बरसले की, मी कांग्रेसचा शिपाई आहे , कांग्रेसचा शिपाई म्हणूनच राहणार परंतु जातीयवादी शक्तीसोबत जाणार नाही. भाजपा पक्ष प्रवेश करणार ह्या कोण खोट्या गोष्टी कुणी पसरविल्या माहीत नाही परंतु मी जातीयवादी शक्तीसोबत जाण्याचा प्रश्नच नाही , मी स्वप्नान सुद्धा असा करीत नाही. मी कोणाला भेटलो नाही , चर्चापण केली नाही तसा प्रस्तावही नाही हि केवळ अफवा आहे. सध्याच्या सरकार मधे काय चालले आहे , माझ्यासारखा पुरोगामी विचाराचा कार्यकर्ता जातीयवादी शक्तीसोबत जाणार कसा , सत्ता आज आहे उद्या नाही मी अनेक पदे भोगले मी कांग्रेसमधेच समाधानी आहे काही कार्यकर्त येतात – जातात कांग्रेसला काही फरक पडणार नाही पण मी मात्र कांग्रेसचा शिपाई आहे आणि शिपाई म्हणुनच राहणार यात तिळमांत्र शंका नाही. अश्या खोट्या अफवा पासुन कांग्रेस कार्यकर्त्यांनी सावध राहावे असेही आमदार विजय भाऊ वडेट्टिवार यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देतांना सांगीतले.

