महत्वाचे निर्णय पारीत
✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
कोरपना:-अनुसूचित जमाती व इतर परंपरागत वन निवासी वन हक्काची मान्यता अधिनियम 2006 नियम 2008 आणि सुधारित नियम 2012 अन्वय अनुसूचित जमाती व इतर परंपरागत वन निवासी यांना कलम ३ (१ ) वैयक्तिक व सामूहिक ग्रामसभेला 364 हेक्टर वन हक्क अधिकार पिपर्डा ग्रामसभेला प्राप्त झालेला आहे 2016मध्ये उपरोक्त वन हक्क पट्ट्याला मान्यता मिळाली होती टाटा सामाजिक विज्ञान संस्था मुंबई व ग्रामसभा पिपर्डाच्या सहभागातून पिपर्डा येथील संवर्धन व व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला होता उपरोक्त आराखडा तयार करून मंजुरीसाठी कन्वर्जन समिती तालुकास्तरीय यांच्याकडे सादर करण्यात आला होता उपरोक्त प्रस्तावाला नुकतीच मान्यता मिळाली असून पुढील कारवाईसाठी जिल्हास्तरीय समितीकडे प्रस्ताव सादर करण्यात आले आहे ग्रामस्थांनी ग्रामसभा घेऊन ग्रामसभेमध्ये शाश्वत विकास वन उपजीविका व निरंतर रोजगार वनाचे संवर्धन आगीपासून संरक्षण वन नैसर्गिक साधन संपत्तीचे संरक्षण त्याचबरोबर ग्रामस्थांची जबाबदारी निस्तार व जलतन त्याचबरोबर गावातील वन उपजाची व वन वुक्ष तोड चोरी यावर परिणामकारक धोरणात्मक नियम तयार करून अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच पुनर्निर्मानाकरिता वन क्षेत्रातील 50 हेक्टर क्षेत्रामध्ये बांबू लागवड त्याचबरोबर अल्प पावसावर निर्माण होणारे फळझाडांची लागवड वन तलाव माती बांध तसेच जंगलाचे वुक्षाची जोपासना करिता सिंचन विहीर इत्यादी कामेमहात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत प्रस्तावित करून अंदाजपत्रक व कारवाई होण्याच्या दृष्टीने गावकऱ्यांनी ठराव पारित केला याबाबत महिला बचत गट शेतकरी उत्पादक कंपनी तसेच भूमिहीनन शेतमजूर यांना सहभागी करून जंगलाचे संरक्षण व जोपासना करण्याबाबत सामूहिक वन हक्क वन व्यवस्थापन समितीने ग्रामसभेच्या समक्ष निर्णय घेतला याकरिता टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे जगदीश डोळसकर अमोल कुकडे तसेच सामाजिक कार्यकर्ते आबिद अली यांनी ग्रामसभेची भूमिका वन हक्क समितीची जबाबदारी व शासनाच्या योजनेतून ग्राम समृद्धी त्याचबरोबर गावातील वन उपजातून रोजगार संधी नैसर्गिक साधन संपत्तीचे संरक्षण करून जंगलामध्ये पुनर्निर्मान व परिणामकारक व्यवस्था निर्माण करण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी समिती अध्यक्ष चंद्रकला येडमे सरपंच इंदिरा कुडमेथे संजय जाधव जगदीश पिंपळकर रामा येडमे लक्ष्मण येडमे प्रवीण जगताप मीनाक्षी डाखरे मंदा पेटकर सुरेखा कुडमेथे गोविंदा कुडवे ते यांचे सह मोठ्या प्रमाणाग्रामस्थ उपस्थित होते यावेळी ग्रामसभेत झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने ग्रामपंचायतने करावी असे सुचविण्यात आले व विकास कामाचे आराखडे तयार करण्यासाठी पंचायत समितीला प्रस्ताव सादर करावा 364 हेक्टर जमीन हक्क मिळाला आहे त्याची मोजणी करून देण्यात यावी याकरिता वनपरिक्षेत्र अधिकारी तहसीलदार व भूमी अभिलेख विभागाला पत्राद्वारे मागणी करण्यात यावी असेही निर्णय घेण्यात आले वं संवर्धन उपक्रमामुळे गावामध्ये वातावरण निर्मिती करण्यात आली असून गावातील नागरिकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात मिळत असल्याचे चित्र गावात निर्माण झाले आहे याकरिता गस्त पथकव आगीचे संरक्षण करण्यासाठी समिती निवड करण्यात आली हे विशेष

