आमदार देवराव भोंगळे यांच्या मागणीला यश.
✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
राजुरा:-दि. ०६
कोरोना महामारीच्या काळात प्रवाशांच्या कमतरतेमुळे बंद करण्यात आलेली काजीपेठ-बल्लारशा-काजीपेठ ही पॅसेंजर रेल्वे गाडी पुन्हा सुरू करण्यात आली आहे. राजुरा विधानसभेचे आमदार श्री. देवराव भोंगळे यांची मागणी लक्षात घेऊन आजपासून ही गाडी प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.
ही रेल्वेगाडी काजीपेठ बल्लारशा काजीपेठ अशी धावणार असून, ती रात्री १० वाजता काजीपेठ येथून सुटेल आणि पहाटे ३ वाजता बल्लारशा रेल्वे स्थानकावर पोहोचेल. या गाडीला १५ थांबे असून गाडीचा क्रमांक १७०३५ असा राहणार आहे. यासोबतच बल्लारशा स्थानकावरून परत काजीपेठकडे वापस जाणारी गाडी पहाटे ४ वाजता सुटून रात्री ९ वाजता काजीपेठ रेल्वे स्थानकावर पोहोचेल आणि या गाडीचा क्रमांक १७०३६ असा राहणार आहे, अशी माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे.
ही रेल्वे गाडी सुरू झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून महाराष्ट्रातून तेलंगणाकडे जाणाऱ्या प्रवाशांना सोईचे झाले आहे. या प्रवाशी हिताच्या प्रश्नाला प्राधान्य देऊन जनमागणी पुर्ण केल्याबद्दल भाजपा राजुरा तालुकाचे सचिव प्रदीप पाला यांनी प्रवाशांच्या वतीने आमदार देवराव भोंगळे यांचे आभार मानले आहेत.

