राजेश येसेकर तालुका प्रतिनिधी भद्रावती
भद्रावती :- “विवाह” हे एक पुरुष व स्त्री अश्या दोन व्यक्तीमधील सामाजिक बंधन आहे. हिंदू धर्मीयांत हा संस्कार आहे, तर अन्य धर्मीयांत हा कायदेशीर करार असतो. विवाह हा संतती किवा वंश पुढे नेण्यासाठीचा कायदेशीर व सामाजिक मार्ग आहे. विवाह संस्था ही संस्कृतीस आणि उपसंस्कृतीस अनुलक्षून विविध पद्धतींनी पतिपत्नींमधले जवळकीचे आणि लैंगिक नाते मान्य करते. विवाहामुळे दोन व्यक्तींचे नव्हे तर दोन कुटुंबे आणि त्यांचे नातेवाईक नात्याने जोडले जातात. या नात्यास लग्नगाठ म्हणतात. लग्न हे पवित्र बंधन आहे.
आपल्या समाजातील मुल – मुली विवाह योग्य झाल्यानंतर त्याचे विवाह जुळविण्याकरीता पालकांना अनेक प्रकारच्या समस्यांना समोरे जावे लागते. सध्याच्या धावपळीच्या युगात एकुण समाजाची बल़लेली जिवनशैली, विखुरलेला समाज, मुला – मुलींची शैक्षणिक प्रगती व त्यांच्या वाढलेल्या आशा अपेक्षा, त्यामूळे जिवनसाथिची निवड करणे कठिण झाले आहे. पालकांच्या या अडचणी दुर करण्यासाठी महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हा यवतमाळ शाखा वणी कटिब्धद प्रयत्न करीत आहे.
या अनुषंगाने शनिवारी दि.१ मार्च २०२५ रोजी वधु – वर व पालक परिचय मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून वधु – वरांना आपल्या जिवनसाथी विषयी अपेक्षा आकांशा व्यक्त करता येईल. या मेळाव्यास संपुर्ण विदर्भातुन उत्तम प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा महाराष्ट्र नाभिक महामंडळ आयोजक शाखा वणी करीत आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. कल्याणजी दळे महाराष्ट्र नाभिक महामंडळ प्रदेशाध्यक्ष, उद्घाटक मा. श्री. राजेंद्र नागतुरे शाखा संस्थापक, सन्माननीय अतिथी मा. श्री. तारेन्द्रजी बोर्डे, मा. श्री. संदीपकुमार अपार उपविभागीय अधिकारी राळेगाव, प्रमुख अतिथी मा. श्री. संजय भाऊ राठोड मृदु व जलसंधारण पालकमंत्री, मा.श्री. हंसराजजी अहिर ओबीसी आयोग अध्यक्ष, मा. श्री. सुधिरभाऊ मुनगंटीवार माजी अर्थमंत्री व वनमंत्री, मा.श्री संजीवरेड्डि बोदकुलवार माजी आमदार वणी, सन्माननीय विशेष अतिथी मा.श्री. दामोधर बिडवे प्रदेश कार्याध्यक्ष, मा. श्री. आशिष खुलसंगे अध्यक्ष वसंत जिनिंग वणी, मा.श्री. संजय खाडे अध्यक्ष जगन्नाथ मल्टीटेस्ट को. ऑप सोसायटी वणी, मा. श्री. नितीन भुतडा भाजपा समन्वयक यवतमाळ जिल्हा, मा. श्री. प्रदीप बनवून बोनगीरवार ओबीसी नेते, मा. श्री. पांडुरंग भवर प्रदेश सरचिटणीस, मा. श्री. सुरेंद्र कावरे युवक प्रदेशाध्यक्ष, मा.श्री. नियुक्ती पिस्तूलकर सर प्राचार्य आर्णी, मा. श्री. गजाननराव वाघमारे विभागीय अध्यक्ष अमरावती. मा. श्री. निळकंठराव तायडे विभागीय उपाध्यक्ष अमरावती, मा. सौ. भारतिताई सोनवने महिला प्रदेशाध्यक्षा, मा. सौ. सरोजताई चांदेकर महिला प्रदेश कार्याध्यक्षा, मा. सौ. शोभाताई नक्षीने महिला जिल्हाध्यक्षा प्रमुख पाहुणे श्री. शेखर वानखेडे जिल्हा संघटक पुसद, श्री पुंडलिक कुबडे जिल्हा कार्याध्यक्ष, श्री. अभय नागतुरे जिल्हा उपाध्यक्ष, श्री महेश हुर्सुलकर युवा जिल्हाध्यक्ष, श्री. स्वप्निल वाटकर युवा जिल्हा यवतमाळ शाखा वणी यांची उपस्थिती राहतील. तरी या कार्यक्रमात सर्व नाभिक समाज बांधवांनी सहभाग दर्शवुन मोठ्या संख्याने उपस्थित राहावे
असे आव्हान आयोजक महाराष्ट्र नाभिक महामंडळ शाखा वणी यांनी केले
