⏯️जिल्हाधिकारी यांना दिले भारतीय कम्युनिस्ट पक्षाने निवेदन
राजेश येसेकर✍️तालुका प्रतिनिधी भद्रावती
भद्रावती : तालुक्यातील रेती घाटातुन अवैद्य रित्या होत असलेल्या रेतीच्या चोरीस येथील तहसीलदार यांचा आशीर्वाद असलेल्याचे निवेदन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सहसचिव व माजी नगरसेवक कॉ. राजू गैनवार यांनी जिल्हाधिकारी यांना दिले.⤵️⤵️⤵️⤵️
या निवेदनावर जिल्हाधिकारी यांनी शिस्टमंडळास चौकशी करून कारवाईचे आश्वासन दिले. तालुक्यात अनेक रेतीघाट आहेत. त्यात पिपरी, तेलवासा, कोंढा, जेना, चंदनखेडा, पाटाळा, राळेगाव ( रिठ ) यासह अनेक लहान - मोठया रेती घाटांचा समावेश आहे. यातील राळेगाव (रिठ ) हा एकमेव रेतीघाट एम.एस. एस.या कंपनीला लीलावात गेला.ही कंपनी दुर्गापूर सिटीपीएस चंद्रपूरला या रेतीचा पुरवठा करते. मात्र इतर रेती घाटाचा लिलाव न होऊन सुद्धा त्यातील रेती मोठया प्रमाणात अवैद्य रित्या जेसीबीद्वारे काढून हायवा,ट्रक, हापटन, टॅक्टरद्वारा चोरी होत आहे. ही चोरी दिवस -रात्र होत आहे. याला स्थानिक तहसीलदार राजेश भांडारकर यांचा आशीर्वाद आहे.
दि.६एप्रिल२०२५ ला पिपरी रेती घाटावर अवैद्य रेती वाहतूक चालू असल्याची माहिती काही तलाठी व पोलीस पाटील यांना मिळाली त्यांनी तिथे धाड टाकली. त्यावेळी टॅक्टर चालक- मालकांनी आम्ही तहसीलदार यांना हफ्ता देतो आपण कारवाई करणारे कोण ? असा प्रश्न करून त्यांना मारहाण केली. या प्रकरणाची पोलिसात तक्रार करण्यात आली. एवढ्या उघडपणे रेती चोरटे बोलत असल्याने त्यात सत्यता आहे. त्यामुळे तहसीलदार यांची या प्रकरणी चौकशी करून कारवाई करावी तसेच त्यांच्या संपत्तीची चौकशी करावी अशी मागणी भारतीय


कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. राजू
गैनवार यांनी जिल्हाधिकारी यांचे कडे केली आहे. या शिस्टमंडळात भा.क.प. राज्य कार्यकारणी सदस्य रवींद्र उमाटे, कॉ. प्रकाश रेड्डी, कॉ. टमटम ,कॉ.नितीन कावठी उपस्थित होते.
