

✍️मुनिश्वर बोरकर
संपादक
गडचिरोली:-सावली – सावली तालुक्यातील शेतकऱ्यांचा विविध मागण्या घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा भव्य मोर्चा मनसेचे जिल्हाध्यक्ष आनंद बावणे , स्वप्नील पेटकर यांच्या नेतृत्वात सावली तहसिल कार्यालयावर धडकला व शेतकऱ्यांच्या मागण्याचे निवेदन तहसिलदार सावली यांना देण्यात आले. सावली तालुक्यात ८० % शेत जमीनी असुन सुद्धा शेतकऱ्यांना पिकविमा पासून वंचित राहावे लागते , अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरपाईची यादी सुडबुद्धीने बनविणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी , खोसीखुर्द प्रकल्पाचे पाणी शेतकऱ्यांना दुबार पेरणीलामिळत नाही , रोजगार हमी योजनेअर्तंगत झालेले पांदन रस्त्ये त्याची चौकशी करावी , प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची यादीत अनागोंदी कारभार सुरु आहे याची चौकशी करण्यात यावी. गावरान जमीनीवर होणारे अतिक्रमण रोखावे , जिर्ण अंगवाड्याचे बांधकाम पुन्हा करावे. सर्व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याची शक्ती करावी , आदि विविध मागण्यांचे निवेदन तहसिलदार सावली यांना देण्यात आले . मोर्च्यात सेनेप्रमुख आनंद बावणे , स्वप्नील पेटकर मनसे सचिव सुरज मडावी , देविदास निकोडे , प्रभाकर भांडेकर , अनिल ठाकरे , गोविंदा निकोडे , प्रणय वाकडे , सुरेश काळंबाधे , महेश नन्नावरे सहीत अंतरगांब , निफदा ‘ विहीरगांव , मेहा , पाले बारेसारसा ‘ निफंद्रा परिसरातील बहुसंख्य कास्तकार मोर्चात सहभागी झाले होते.
