संपादक मुनिश्वर बोरकर गडचिरोली.
गडचिरोली:-सत्यशोधक बौध्द समाज रांगी (जमिनदारी ) ता. धानोरा येथील बुद्धविहारात तथागत भगवान गौतम बुद्धाची प्रतिष्ठापना व धम्मदेशना कार्यक्रम रविवार दि. ४ मे २०२५ दुपारी १२ वाजता भन्ते भिक्खु सोन पवराणा धम्मभुमी दिघोरी व भन्ते विमलचित्त यांच्या हस्ते परित्राण पाठ होणार असुन दुपारी 3 वाजता मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.
⛔कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक साहित्यिक जावेद पाशा कुरेशी , अध्यक्ष भारतीय मुस्लीम परिषद नागपूर हे असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष रिपब्लिकन पार्टीचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर तर मुख्य अतिथी म्हणुन राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष रविभाऊ वासेकर , आदिवासी नेत्या डॉ. सोनल कोवे , रिपाई नेते गोपाल रायपूरे , माजी सभापती विलास दशमुखे , माजी जि.प सदस्य शशीकांत साळवे रांगी , रिपाईच्या महिला नेत्या ॲड. प्रियंका चव्हाण चंद्रपूर , इंडो एसिया मेंत्था फाऊडेशन च्या स्मिता वाकडे नागपूर , सामाजिक कार्यकर्त्या शुशीला भगत आलापल्ली , प्रा. दिलीप बारसागडे , सरपंच फालेश्वरी गेडाम रांगी , दिलीप कांटेगे महाराज रांगी ,रिपाई नेते ॲड. शांताराम उंदिरवाडे , mim च्या आलिया शेख गडचिरोली , कुलपती मेश्राम मोहली , प्रदिप खोब्रागडे बसपा प्रभारी आदि लाभणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणुन रिपाईचे कार्याध्यक्ष मुर्लीधर भानारकर , .मारोती भैसारे , सुनिल सहारे , प्रमोद सरदारे , सोनु साखरे , दशरथ साखरे , रघुनाथ दुधे , पत्रकार दिनेश बनकर , रुषी रामटेके भिमराव साखरे नागपूर , संघमित्रा राजवाडे , लता भैसारे , सुरेखा बारसागडे , लालाजी नगराळे , आदि लाभणार आहेत. रात्रौ ९ वाजता गायक विजय शेंन्डे यांचा प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे तरी रांगी परिसरातील बहुसंख्य नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन समाजाचे अध्यक्ष तामराज मेश्राम , सचिव जर्नाधन बांबोळे , यशपाल ढेंभुर्णे , ललित ढेंभुर्णे आदिती केलेले आहे.⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️

