संपादक प्रा. मुनिश्वर बोरकर
गडचिरोली:- अहेरी – पंचशिल बौद्ध समाज मंडळ रसपल्ली ता – अहेरी येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण सोहळा तक्षशिला बुद्ध विहार रसपल्ली येथे सोमवार दि. २१ एप्रिल २०२५ सकाळी ११ वाजता पुज्यनिय भन्ते डॉ. सेवक महाथेरो नागपूर यांचे हस्ते विधिवत उद्घाटन झाल्यानंतर दुपारी २ वाजता धम्मदेशना व मार्गदर्शन होणार आहे ,
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष नरेन गेडाम आंबेडकरी विचारवंत सावली उदघाटक दासुरकर उपविभागीय अधिकारी जिमलगट्ठा , तर प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून बिरादार साहेब उपविभागीय अधिकारी जिमलगट्टा , गौतम मेश्राम गडचिरोली. सामाजिक कार्यकर्ता प्रा. मुनिश्वर बोरकर गडचिरोली , गोपाल रायपूरे चंद्रपूर. शुशीला भगत आलापल्ली , व्येंकटी दुर्गम सर सिरोंचा , कावरे सर सिरोंचा , समाजाचे अध्यक्ष पिरिग्या कोटारी ‘ नंदेश्वर मेश्राम सामाजिक कार्यकर्ता जिमलगट्टा आदिची उपस्थिती लाभणार असुन मुर्ती दान करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या शुशीला भगत आलापल्ली यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
रात्रौ ८ वाजता रेन्जारला राजेश तेलंगणा यांच्या तेलंगु भिम गिताचा कार्यक्रम होणार आहे. तरी सदर कार्यक्रमास बहुसंख्येनी उपस्थित राहण्याचे आवाहन पंचशिल बौद्ध समाज मंडळ रसपल्ली च्या पदाधिकाऱ्यांनी केलेले आहे.👇🏾👇🏾👇🏾👇🏾👇🏾👇🏾👇🏾

