गडचिरोली संपादक मुनिश्वर बोरकर
औंधी:-खिचपत पडलेल्या मजदूर १८ तास काम करायचे त्यांना सुट्टी नव्हती. मिल मालकांची मनमानी होती. परंतु विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात कायदा बनवून ८ तास काम रविवारी सुटी व बोनस चा अधिकार सर्वासाठी दिला. शिकलेले १४% लोक राज्य चालवित होते. शेतकऱ्यांच्या मालाला कवळीमोल भाव मिळत होता. डॉ.आंबेडकरांनी शेतकऱ्यांच्या हिताचा कायदा बनविला. धर्म कोणताही असो शिक्षण सर्वांना मिळाले पाहिजे. सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी संविधान बनविला एवढे महान व्यक्ती डॉ. बाबासाहेब होते म्हणुन आज त्यांची जयंती साजरी करीत आहोत. हे आदिवासी , मुसलमान ,बौद्ध बांधवांनी लक्षात ठेवलं पाहिजे अश्या प्रकारचे मोलाचे मार्गदर्शन साहित्यिक जावेद पाशा कुरेशी अध्यक्ष भारतीय मुस्लिम परिषद नागपूर यांनी औधी – छत्तीसगड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती प्रसंगी केले.👇👇👇👇

क्षेत्रिय बौद्ध समाज औधी छत्तीसगड येथे दि. १८ एप्रिलला समाज प्रबोधन कार्यक्रम धनराज बांबोळे औधी यांच्या अध्यक्षते खाली तर प्रमुख अतिथी म्हणून महेंद्र शाहु , रिपाईचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर , रिपाई चंद्रपूर जिल्हाध्यक्ष गोपाल रायपूरे , रिपाई महिला आघाडीच्या ॲड. प्रियंका चव्हाण चंद्रपूर, संतोषी ठाकुर छत्तीसगड , ज्ञानेश्वर रामटेके मानपूर , यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली पार पडला. या प्रसंगी ॲड. प्रियंका चव्हाण म्हणाल्या की , डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठी जन्म घेतला , शिक्षा दिली , धम्म दिक्षा दिली हिच खरी क्रांती आहे. आता आपणाला परिवर्तनाची लढाई लढायची आहे. डॉ.आंबेडकर एक अशी ऊर्जा आहे की , संविधानाला कुणीही हात लावू शकणार नाही. रात्रौ गायक अलोणे यांच्या भिमगिताचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे संचलन सत्यवान वाकडे तर आभार रामटेके सर यांनी मानले. कार्यक्रमास गडचिरोली जिल्ह्यातुन रिपाईचे उपाध्यक्ष मारोती भैसारे , दशरथ साखरे , रघुनाथ दुधे , गायक विजय शेंन्डे , निलेश उराडे , अजय चव्हाण , वंदना चव्हाण बल्लारसा ‘ रायपूरे मॅडम व्याहाड आदि साहित बहुसंख्य नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.

