गडचिरोली जिल्ह्यात 50 तलावांचे खोलीकरण व गाळमुक्त करण्याच्या काम होणार
संपादक मुनिश्वर बोरकर गडचिरोली
गडचिरोली:-दिनांक 19 एप्रिल 2025 कुरखेडा तालुक्यातील गुरनोली येथे सिने अभिनेते नाना पाटेकर, व मकरंद अनासपुरे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण
महाराष्ट्रात नाम फाउंडेशनचे माध्यमातून गावे पाणीदार करण्याचे
हेतूने मोठया प्रमाणात काम सुरु आहे नाम फाउंडेशनचे सीईओ श्री गणेश जी थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली जलसंधारणाची कामे गावागावात करण्याचा मानस चालू आहे त्याच धर्तीवर
नाम फाउंडेशन व टाटा मोटर्स, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मानवाधिकार संघटना महाराष्ट्र प्रदेश यांच्या सहकार्याने आजपासून येथील तलावाचे खोलीकरणाच्या, गाळ उपसा कामाचे भव्य शुभारंभ करून सुरुवात करण्यात आले, या कार्यक्रमात गडचिरोली जिल्ह्याचे पद्मश्री मा, डॉ, परशुराम खुणे यांच्या शुभहस्ते शुभारंभ करण्यात आला प्रमुख पाहुणे राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ, प्रणय भाऊ खुणे,सरपंच सुप्रिया तुलावी, उपसरपंच मंगेश कराडे,ग्रामसेविका आरती भोयर गावातील प्रतिष्ठित देवानंदजी खुणे, लक्षपति गुटके श्रीकांत गोबाडे, पुरुषोत्तम गोबाडे मुन्ना भाऊ डहारे, पारस भाऊ खुणे विवेक भाऊ बुद्धे , राष्ट्रीय मानवाधिकार संघटना जिल्हा अध्यक्ष रमेश अधिकारी,रोजगार सेवक सचिन सहारे व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित त्यांना पद्मश्री डॉ, परशुराम खुणे, डॉ,प्रणय खुणे, नाम फाउंडेशनचे विदर्भ समन्वयक उमेश पाटील, यांनी मार्गदर्शन केले यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे यांनी सांगितले या योजनेद्वारे निश्चितच विविध गावाचा पाण्याचा स्तर वाढणार आहे व सदर कार्यक्रम लोकसभागातून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात राबवायचा आहे त्यामुळे या कामांमध्ये जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लोकसहभाग द्यावा असे आवाहन केले यावेळी नाम फाउंडेशनचे विदर्भ समन्वयक उमेश पाटील यांनी बोलताना सांगितले गडचिरोली जिल्ह्यातील 50 तलावांचे गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार करणार आहोत यामध्ये संपूर्णपणे या गावातील शेतकऱ्यांचा सुद्धा खूप मोठा लाभ होणार आहे कारण तलावातील गाळ सर्वांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे
व यामुळे पाण्याची पातळी सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढणार आहे सदर योजनेचे शुभारंभ करत असताना गुरुनोली येथील नागरिकांनी नाम फाउंडेशन आणि टाटा मोटर्स व राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जाहीर आभार मानले,

