विधिमंडळ काँग्रेस गटनेते, आमदार विजय वडेट्टीवार यांचा पुढाकार
✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
सावली:-आज दिनांक ०१ मार्च २०२५ ला सावली तालुक्यातील मौजा.दाबगाव येथे विधिमंडळ काँग्रेस गटनेते आमदार मा.श्री.विजय वडेट्टीवार यांचा यांच्या वतीने कॅन्सरग्रस्त रुग्णास आर्थिक मदत करण्यात आली.
दाबगाव येथील कॅन्सरग्रस्त रुग्ण शरद भोयर वय ३२ वर्षे हे भूमिहीन शेतमजूर असून मिडेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत,परंतु वारंवार प्रकृती खराब होत असल्यामुळे दवाखान्यात उपचार घेत होते, उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना कॅन्सर असल्याचे सांगितले,पुढील उपचारासाठी आर्थिक मदत हवी असल्याची माहिती दाबगाव येथील युवा कार्यकर्ते पियुष सुहागपुरे यांनी युवा नेते,कृषी उ.बाजार समितीचे संचालक निखिल सुरमवार यांना दिली असता त्यांनी विधिमंडळ काँग्रेस गटनेते विजय वडेट्टीवार यांना संपर्क सदर रुग्णास आर्थिक मदत मिळवून दिली.
आर्थिक मदत देताना युवा कार्यकर्ते पियुष सुहागपुरे,प्रकाश आभारे,दियेस आभारे आदी उपस्थित होते.
