संपादक ,✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली:-बाळ कोल्हाटकर यांच्या जिवनावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम केमिस्ट भवन गडचिरोली येथे मोठया थाटात संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष झाडीपट्टी नाटय कलावंत शिद्धार्थ गोवर्धन हे होते तर कार्यक्रमाचे उद्घाटक नाट्यकलावंत दादा चुधरी यांचे हस्ते पार पडले प्रमुख पाहुणे म्हणुन आदिवासी सेवक कवि वसंत कुलसंगे , प्रविण मुक्तावरण , गायीका लोपाताई शेंन्डे , स्त्रि अभिनेत्री उषा मुळे आदि लाभले होते. तसेच कार्यक्रमाचे समन्वयक शाहिर अलंकार ढेभुर्णे या कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित होते. बाळ कोल्हटकर यांच्या जिवन चरित्रावर प्रमुख अतिथींनी प्रकाश टाकला. बाळ कोल्हटकर यांच्या कविता , नाटके , लेखन साहित्य तसेच गित याबाबत वक्त्यांनी बरीच माहिती दिली. कोल्हटकर हे उत्तम वक्ते , दिग्दर्शक उत्तम कवि लेखक होते हे आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिसुन आले. कविवर्य विजय शेंन्डे लेखक तुळसिराम उंदिरवाडे यांच्या गित गायन व कविता वाचनाने श्रोत्यांची मने जिंकली. कार्यक्रमास बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

