🟨नागपूर आयटीसेलच्या माध्यमातून मानाचा पुष्पगुच्छ पोहोचवला – जल्लोषात अभिष्टचिंतन सोहळा
✍️मुनिश्वर बोरकर
संपादक
गडचिरोली:- दि. ०१ जुलै २०२५
पोटेगाव बायपास रोडवरील यमुना हॉल, गडचिरोली येथे माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात पार पडला.या विशेष प्रसंगी राज्याचे माननीय मुख्यमंत्री मा.ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस तसेच महाराष्ट्र विधान परिषदेतील सदस्य मान. आमदार श्री संदीपजी जोशी यांच्यावतीने मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांना खास शुभेच्छा देत, नागपूर आयटीसेलच्या माध्यमातून एक भव्य पुष्पगुच्छ पाठवण्यात आला.

💐या शुभेच्छा नागपूर येथील भाजपा आयटीसेलचे समन्वयक कौशिक जोशी, रणजित आडे, डॉ. हिमांशु चौधरी यांच्या हस्ते नेते साहेबांपर्यंत पोहोचवण्यात आल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आमदार संदीप जोशी यांच्या या स्नेहमूल्य शुभेच्छांचा स्वीकार करताना डॉ. अशोकजी नेते यांनी मनापासून आभार मानले. “राजकारण हे परस्पर सन्मानाचे माध्यम असून, अशा शुभेच्छा हे स्नेहाचे दर्शन आहे,” असे भावनिक उद्गार त्यांनी काढले.

या सोहळ्याला उपस्थित असलेली नेत्यांची मांदियाळी हा डॉ. नेते यांच्या नेतृत्वावरील विश्वासाचा आणि समाजसेवेतील सातत्याचा मोठा पुरावा होता. यावेळी उपस्थित मान्यवर आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे,किसान मोर्चा प्रदेश सचिव रमेशजी भुरसे,मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रणयजी खुणे,जिल्हा महामंत्री सदानंदजी कुथे,जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी,आयटीसेलचे आदिवासी युवा नेते अक्षय ऊईके,ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर,भाजपा शहराध्यक्ष अनिल कुनघाडकर,भाजयुमो जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, कामगार आघाडी प्रदेश सचिव गोवर्धन चव्हाण,भाजपा तालुकाध्यक्ष दतू सुत्रपवार,
युवा नेते सचिन तंगडपल्लीवार रविंद्र भाऊ रोहनकर,संजय बारापात्रे,दतू माकोडे,दीपक सातपुते,रमेश नैताम यांच्यासह विविध स्तरांतील पदाधिकारी, कार्यकर्ते, युवामोर्चा सदस्य, आणि असंख्य शुभेच्छुक व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या संपूर्ण वातावरणात केवळ वाढदिवसाचा उत्साह नव्हता, तर एका कार्यकर्त्याच्या नेतृत्वाचा, सामाजिक बांधिलकीचा आणि निष्ठेचा गौरव झळकत होता.डॉ. अशोकजी नेते यांचे सामाजिक कार्य, नेतृत्वगुण आणि राष्ट्रसेवेतील योगदान यामुळे आजचा दिवस भाजपा कुटुंबासाठी अभिमानाचा ठरला.

