डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्याच समाजावर अन्याय केला नाही. प्रा. मुनिश्वर बोरकर
गडचिरोली:-घोट डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महान व्यक्ती होते की त्यांनी सर्व समाजाला समानतेने हक्क व अधिकार दिले. स्वातंत्र , समता , बंधुता व न्याय यावर आधारीत नव समाज निर्माण केला असे विचार सामाजिक कार्यकर्त प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी माडले. बाबासाहेब आंबेडकर जयंती प्रसंगी डॉ. आंबेडकर यांच्या भव्य पुतळ्याला API गोहणे यांनी मार्लापन केले .डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव घोट येथील कार्यक्रमाचे अध्यक्ष रुपालीताई दुधबावरे सरपंच घोट , माजी आमदार डॉ. देवराव होळी , घोट पोलीस स्टेशनचे API घोट , सामाजिक कार्यकर्ता गोपाल रायपूरे , भोजराज कानेकर गडचिरोली , डॉ. मेश्राम , गोहणे मॅडम , मंडळाचे अध्यक्ष विकास दहिवले , प्रा. चोपराम कांबळे ,ग्रा.प सदस्या पोरड्डीवार मॅडम , रवि सोमनकर , पवन दुधबावरे , आशिष सय्यद , निलकंठ मेश्राम , विलास उइके , आदि लाभले होते. याप्रसंगी गोहणे मॅडम म्हणाल्या की , डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचे जरी पाच लोक असले तरी समाज परिवर्तन होवू शकते. डॉ. होळी म्हणाले की संविधान संपविणार अश्या अफवा पसरविल्या जातात परंतु आमचे भाजपाचे सरकार संविधानाचे आदर करणारे आहे. याप्रसंगी गोपाल रायपूरे , API गोहणे , भोजराज कानेकर , प्राचार्य कांबळे , डॉ . मेश्राम , इटकेलवार , पत्रकार इंडिआ नगराळे आदिचे समायोचित भाषणे झालीत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष विकास दहिवले संचलन खुशाल खोब्रागडे तर आभार प्रदिप वाकडे यांनी मानले. कार्यक्रमास घोट सर्कल मधील बहुसंख्य कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

