✍️मुनिश्वर बोरकर
संपादक
9421734792
गडचिरोली: गडचिरोली पगारदार कर्मचारी व नागरी तथा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था संघ मर्यादित गडचिरोली, सहकार भारती व सहकार विभाग गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ निमित्त आयोजित जिल्ह्यातील विविध सहकारी पतसंस्थांचे पदाधिकारी, संचालक व कर्मचाऱ्यांसाठी शिवाजी इंग्लिश अकॅडमी स्कूल गोकुलनगर येथे दोन दिवशीय सहकार प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या दोन दिवसीय प्रशिक्षणात संचालकाचे कर्तव्य व जबाबदाऱ्या तसेच 97 वी घटना दुरुस्ती व सहकार कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदी यावर नागपूरचे सहकार तज्ञ एडवोकेट प्रशांत शिर्के, नियमक मंडळाच्या नवीन तरतुदी तसेच सहकारी पतसंस्थेचे कर्ज वाटप व कर्ज वसुली यावर महाराष्ट्र राज्य सह. संघ मर्यादित पुणे चे सेवानिवृत्त मुख्याधिकारी डी. एन. काकडे यांचे तर आयकर कायद्यातील तरतुदी यावर ऍड. प्रसाद राजंदेकर यांचे मार्गदर्शन लाभले यावेळी मान्यवरांच्या हस्ते जिल्ह्यातील उत्कृष्ट पतसंस्थांना स्व. प्राचार्य खुशालराव वाघरे जिल्हा सहकार पुरस्कार २०२४ ने स्मृतिचिन्ह व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विदर्भ को ऑप फेडरेशन लिमिटेड अमरावती चे उपाध्यक्ष तथा दि गडचिरोली नागरी सहकारी पतसंस्था चे अध्यक्ष अनिल पाटील म्हशाखेत्री होते तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा पतसंस्था संघाचे अध्यक्ष दिलीप खेवले, मानद सचिव प्रा. शेषराव येलेकर, दि गडचिरोली नागरी सहकारी पतसंस्थेच्या उपाध्यक्ष सुमतीताई मुनघाटे, मानद सचिव सुलोचनाताई वाघरे, आयकर तज्ञ एड. प्रसाद राजेंदकर होते.
स्वर्गीय प्राचार्य खुशालराव वाघरे स्मृति प्रित्यर्थ उत्कृष्ट सहकारी पतसंस्था जिल्हा सहकार पुरस्कार २०२४
गट अ – पगारदार कर्मचारी सहकारी पतसंस्था (जिल्हास्तर)
प्रथम :- महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्था मर्यादित गडचिरोली.
द्वितीय :- गडचिरोली जिल्हा रुग्णालय कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित गडचिरोली.
तृतीय :- गडचिरोली जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित गडचिरोली.
गट ब – नागरी सहकारी पतसंस्था (जिल्हास्तर)
प्रथम – गृहलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित गडचिरोली.
द्वितीय – दि गडचिरोली नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित गडचिरोली.
तृतीय – प्रगती नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित आलापल्ली.
गट अ – पगारदार कर्मचारी सहकारी पतसंस्था (तालुकास्तर)
प्रथम – शासकीय व पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित कुरखेडा.
द्वितीय – वन कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित वडसा.
तृतीय – प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित कुरखेडा.
गट ब -नागरी सहकारी पतसंस्था (तालुकास्तर)
प्रथम – वैनगंगा महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित गडचिरोली
द्वितीय – राधाकृष्ण महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित गडचिरोली
तृतीय – सेमाना नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित गडचिरोली.
या समारोपिय कार्यक्रमाचे संचालन व आभाप्रदर्शन संघाचे व्यवस्थापक भास्कर नागपुरे यांनी केले .
कार्यक्रमाला संचालक किशोर मडावी, व्यवस्थापक लिंगाजी मोरांडे, भास्कर खोये, कृष्णा अर्जुनकर , प्रगती पतसंस्था आलापल्लीचे व्यवस्थापक बैरागी, तथा जिल्ह्यातील विविध पतसंस्थांचे पदाधिकारी संचालक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
