कोरोना काळातील थकीत मानधन देण्याची मागणी
✍️मुनिश्वर बोरकर
संपादक
9421734792
चंद्रपूर:-आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गट प्रवर्तक कर्मचारी संघटना चंद्रपूर द्वारा कॉ.विनोद झोडगे राज्य सचिव आयटक यांच्या नेतृत्वात मा.विनय गौडा जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन मनपा,नगर परिषद बलारपूर,भद्रावती,नगर पंचायत पोंबुरणा,गडचांदुर,चिमूर, नागभीड,जिवती व सावली अंतर्गत नागरी भागात आरोग्याचा काम करणाऱ्या आशा व गट प्रवर्तक कर्मचारी यांना कोरोना काळातील केलेल्या कामाचा मोबदला मार्च 2020 ते ऑक्टोबर 2022 पर्यंत दरमहा हजार रुपये देण्याची मागणी करण्यात आली.जिल्हाधिकारी यांच्या सोबत चर्चा केली असता लवकरच सर्व मुख्याधिकारी यांची बैठक घेऊन कोरोना थकीत मानधन देण्यासाठी आदेशित करणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी मान्य केले आहे.कोरोना काळात जीवाची पर्वा न करता रात्र न दिवस कोरोना बाधित लोकांचे सर्व्हे करणे,गोळ्या वाटप करणे , कोरंटाइन करणे यासह अनेक कामाची जोखीम पत्करून कोरोना सारख्या महा भयानक आजाराला हद्द पार करण्यासाठी आशा वर्कर व गट प्रवर्तक यांची भूमिका महत्वाची आहे आणि या कामाची खुद दखल जागतिक आरोग्य संघटनेने घेऊन आशा वर्कर यांचा जागतिक स्तरावर सन्मान केला आहे तरीपण त्यांनी कोरोना काळात केलेल्या कामाचा मोबदला अजूनही थकीत आहे ही अत्यंत गंभीर बाब आहे तेव्हा तातडीने थकीत मानधन देण्याची मागणी आयटक संघटनेनी केली आहे यावेळी निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष कॉम.विनोद झोडगे जिल्हा संघटक कॉम.प्रदीप चिताडे, कॉम.रवींद्र उमाटे बलार्शाहा शहर आशा वर्कर व गट प्रवर्तक कर्मचारी संघटनाचे अध्यक्ष वसुधरा करमनकर,सचिव सुनीता घुबडे,गायत्री हिरण,कल्पना देवईकर, ज्योती पाटील यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

