✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
वणी:-डिकुंडवार सर इंग्लिश ट्युशन क्लासेस च्या वतीने येत्या 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांकरता ट्युशन क्लास मध्ये करण्यात आलेले होते. या सामान्य ज्ञान स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक गायत्री नरेंद्र पारोधी तर द्वितीय क्रमांक प्रगती विजय कठाने तर तृतीय क्रमांक आयशा प्रकाश उठलावार यांनी प्राप्त केला, या सर्व विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन गुणगौरव व सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून निशान शेख मॅडम , शीतल रामगिरवार मॅडम , सविता क्षीरसागर मॅडम उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार राकेश डिकु़डवार सर यांनी केले विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना समाजासमोर प्रगट करण्यासाठी दरवर्षी अशा स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असते असे मत दिकुंडवार सर यांनी व्यक्त केले

