संपादक मुनिश्वर बोरकर
गडचिरोली:-पवार पेट्रोल पॅम्प च्या समोरील पोटेगांव बायपास कार्नरवरच अनेक दुकाने थाटली आहेत . त्यापैकी चिकन विकणाऱ्या व अवैध दारु विक्री करणाऱ्या महिलेस गडचिरोली पोलीस व मुक्तिपथ च्या कार्यकर्त्यानी रंगेहाथ पकडले. याच मार्गावर मागील महिन्यात पानटेला वरून अवैध दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीस गडचिरोली पोलीसांनी पकडले होते. पुन्हा पोलीसांना सुगावा लागताच चिकन विक्री करणाऱ्या व अवैध दारू विक्री करणारी ताजु फैय्यास शेख या महिलेला दारुच्या निपा विकतांना पकडले 3८ देशी दारूच्या निपा पकडल्या त्याची अंदाजे किमंत अडीच हजार रुपये आहे. सदर कारवाई गडचिरोली पोलीस ठाण्याचे ठाणेदार सिंजनगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली धनजंय चौधरी , वृशाली चव्हाण व मुक्तिपथ चे संघटक रेवनाथ मेश्राम यांनी पकडले व तिच्यावर गुन्हा दाखल केला. दारूविक्री करणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत

