संपादक मुनिश्वर बोरकर
गडचिरोली:-महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे राज्य स्तरीय महिला अधिवेशन दि. १५व १६ मार्च २०२५ ला कामठी रोड कन्व्हेंशन सेंटर नागपूर येथे आयोजित करण्यात आलेले आहे
कार्यक्रमाचे उदघाटक रविंद्र रुक्मिणी पंढरीनाथ अभ्यासक नागपूर हे असुन प्रमुख अतिथी म्हणुन भाप्रसे विभागिय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी नागपूर , जिल्हाधिकारी डॉ. बिपिन इटणकर नागपूर , प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग बाबासाहेब देशमुख नागपूर , सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे नागपूर , कार्यक्रमाचे अध्यक्षा प्रा. संध्याताई राजुरकर संपादक नागपूर , राज्य कार्यकारणी सदस्य मुक्ता नरेंद्र दाभोलकर आदि लाभणार आहेत. अंनिसची वैचारिक भुमिका , अंनिसची वाटचाल , स्त्रिया व अंधश्रद्धा , गटचर्चा आदि विषयावर चर्चासत्र पण आयोजित करण्यात आलेले आहे . गडचिरोली जिल्हयातून संयोजक प्रा. मुनिश्वर बोरकर व चंद्रशेखर भडांगे यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातून पन्नास अंनिस कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती दशरथ साखरे , मारोती भैसारे , लता लिहीतकर , लता भैसारे , संघमित्रा राजवाडे आदिनी दिली.

