प्रा. मुनिश्वर बोरकर
संपादक
गडचिरोली:-आजच्या धकाधकीच्या जिवनात लग्न जुळविणे कठीण काम होवून बसले आहे. त्यामुळे वर वधु परिचय मेळाव्यातून लग्न जुळविता येतो व कमी खर्चात लग्न होवू शकतो.

💮भेटी गाठी व परिचयाच्या माध्यमातून समाज बांधव एकत्रित येतो. अश्या प्रकारचे मार्गदर्शन रिपब्लिकन पार्टी चे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी उपवर वधु परिचय मेळाव्या प्रसंगी केले.
माता रमाई बुद्धिझम परिणय ब्रम्हपुरीचे वतीने बौद्ध
धम्मीय उपवर वधु परिचय मेळावा राणी दुर्गावती हायस्कुल गडचिरोली येथे दि. १८ मे २०२५ रोजी पार पडला. या कार्यक्रमाचे उदघाटक रिपाई नेते प्रा. मुनिश्वर बोरकर तर प्रमुख अतिथी म्हणून बामसेफ चे जिल्हाध्यक्ष भोजराज कानेकर , चेतन इंटरप्राईजेस गडचिरोलीचे रत्नघोष नान्होरीकर , रिपाईचे जिल्हा उपाध्यक्ष दशरथ साखरे , लताताई भैसारे ,सामाजिक कार्यकर्ता दामोधर शेंन्डे , रिपाईचे महासचिव सुनिल सहारे कुरखेडा आदि उपस्थित होते.
याप्रसंगी भोजराज कानेकर म्हणाले की , आजच्या काळात लग्न जोडविण्यात मुलींचा शोध घ्यावा लागतो कारण मुलीचे जन्मदर कमी आहे.प्रत्येकच मुलीना नोकरदार वर पाहीजे. मुलांना नोकऱ्या नाही. अश्या कठीण परिस्थितीत जुळवा जुळव करण्याकरीता अश्या मेळाव्याची आवश्यकता आहे.
कार्यक्रमाचे संचलन प्रमोद राऊत यांनी तर आभार घनश्याम रामटेके यांनी केले. उपवर – वधु परिचय मेळाव्यात १०० चे वर युवकांनी आपापला परिचय दिला.कार्यक्रमास रमेश बागडे , धर्मप्रकाश शेंडे , विवेक मेश्राम ‘ पंढरीनाथ आडे , विजयाताई शुकदेवे आदिनी सहकार्य केले.🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻


