✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक

राजुरा:-आज सकाळी राजुरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात नगर परिषदेच्या वतीने आयोजित शिवजयंती कार्यक्रमास उपस्थित राहून छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण मानाचा मुजरा केला.
प्रसंगीच उपस्थितांना शिवजयंतीच्या मंगलमय शुभेच्छा देत शौर्य, पराक्रम आणि न्यायाच्या अधिष्ठानावर उभ्या राहिलेल्या स्वराज्याच्या या महान योद्ध्याचे आदर्शवत विचार आजही जगभरातील प्रत्येक स्वाभिमानी नागरीकास प्रेरणादायी आहे. महाराजांच्या स्वराज्य स्थापनेतील त्याग, पराक्रम आणि दूरदृष्टी यांची शिकवण पुढील पिढ्यांसाठी मार्गदर्शक राहील. अशी भावना याठिकाणी व्यक्त केली.
यावेळी माझ्यासमवेत तहसीलदार तथा नगर परिषदेचे प्रशासक ओमप्रकाश गोंड, भाजपचे शहराध्यक्ष सुरेश रागीट, माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, प्रशांत गुडांवार, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष प्रफुल्ल घोटेकर, विनोद नरेन्दुलवार, छबिलाल नाईक, योगीता भोयर आदिंसह न.प. अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
