✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
कोरपना:-बिहार राज्यातील बुद्धगया येथील बौद्धाचे महाबोधी महाविहार बौद्धांना सोपविण्यात यावे या रास्त मागणीच्या समर्थनार्थ कोरपना तालुका बौद्धजनाचा तारीख २१ मार्च २०२५ ला दुपारी बारा वाजता कोरपना तहसीलदार कार्यालयावर बौद्धजनाचा बौद्ध महामोर्चा काढण्यात आला.

🌟बिहार राज्यातील बुद्धगया येथील बोधीवृक्ष असलेल्या स्थळावर तथागत बुद्ध यांना बोधी ज्ञान प्राप्त झाल्याच्या स्मरणार्थ महान चक्रवर्ती सम्राट अशोकाने बुद्धगया येथे साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेण्याएवढे महाबोधी महाविहार बांधले. हे जगातील बौद्धांचे प्रेरणादायी उपासना आणि श्रद्धेचे स्थान आहे त्यामुळे जगभरातील बौद्ध उपासक फार मोठ्या प्रमाणात या स्थळाला भेट देत असतात आणि करोडो करोडो दान देत असतात. या दानावर डोळा ठेवून येथील पंडे, पुजारी आणि ब्राह्मण यांनी या विहारावर ताबा मिळवून बौद्ध स्थळांचे ब्राह्मण व्रतवैकल्ये, पुजा अर्चना करून विकृतीकरण केले जात आहे. यांच्या जोडीला बिहार सरकारने बोधगया टेंपल एक्ट- १९४९ बौद्ध धम्माच्या विरोधात कायदा करून ब्राह्मण पंडे पुजारी यांना पाठबळ दिले आहे आणि बौद्धांना अदखलपात्र केले आहे. म्हणून बौद्धांचे महाबोधी महाविहार बौद्धांना सोपविण्यात सोपविण्यात यावे या मागणीसाठी कोरपना तहसीलदार कार्यालयावर महामोर्चाचे आहे आयोजन करण्यात आले होते.

सदर महामोर्चा हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्थापित दी बुद्धीस्ट सोसायटी आॉफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा तालुका कोरपनाच्या वतीने आदरणीय भंते कश्यप, ऐतिहासिक बुद्धभूमी गडचांदूर त कोरपना जि चंद्रपूर यांच्या नेतृत्वाखाली आणि भिक्खूसंघ भंते रेवत दीक्षाभूमी चंद्रपूर, भंते भारतद्वाज इंद्रवेल्ली आदिलाबाद आणि भंते नाथापुण्ण नागपूर यांच्या उपस्थितीत कोरपना बस स्टॉन्ड ते तहसीलदार कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला.
🚨कोरपना तहसीलदार कार्यालयाच्या फाटकाजवळ भंते कश्यप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत दिव्यकुमार बोरकर, विलास नरांजे, इश्वर पडवेकर, प्रा. हेमचंद दुधगवळी, श्रावण जीवने इत्यादीने विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोककुमार उमरे, संचलन बादल चांदेकर, आभार प्रदर्शन अनंता रामटेके यांनी केले.

महामोर्चात कार्यकर्त्यांचे भाषण सुरू असताना अचानक वादळी पावसाने हजेरी लावल्याने थोडी तारांबळ उडाली आणि कार्यकर्त्यांचे भाषण आटोपते घेण्यात आले.
तहसीलदार कोरपना यांच्या कार्यालयावर महामोर्चा नेल्यानंतर भंते कश्यप यांच्या नेतृत्वाखाली मा. तहसीलदार कोरपना यांच्या मार्फत मा. महामहिम राष्ट्रपती भारत सरकार नवी दिल्ली यांना ‘बुद्धगया टेम्पल एक्ट- १९४९ रद्द करून बुद्धगया येथील बौद्धाचे महाविहार बौद्धांना सोपविण्यात यावे’ या मागणीचे निवेदन देण्यात आले.
सदर महामोर्चात कोरपना तालुक्यातील उपासिका उपासक, कार्यकर्ते शुभ्र वस्त्र परिधान करून हातात धम्मध्वज घेऊन महामोर्चाचे बॉनर फडकवित आणि महाबोधी महाविहार बौद्धांना सोपविण्यात यावे अशा घोषणा देत फार मोठ्या प्रमाणात आंदोलनात दी बुद्धीस्ट सोसायटी आॉफ इंडियाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
