✍️मुनिश्वर बोरकर
संपादक

गडचिरोली:-महाराष्ट्राच्या राजनिति मधे कांग्रेस पक्षातील मंडळी भाजपात तर कुणी राष्ट्रवादी कांग्रेस ( अजित पवार ) गटात जाण्याची सर्वत्र चर्चा असुन अश्यातच ब्रम्हपुरी निर्वाचन क्षेत्रातील आमदार विजयभाऊ वडेट्टिवार यांचे खंदे समर्थक ब्रम्हपुरी नगर परिषदेचे गटनेते विलास विखार , माजी उपाध्यक्ष डॉ. सतिश कावळे , गौरव अशोक भैय्या , माजी सभापती नामदेव लांजेवार , सुरेश दुर्वे , शुकदेव खेने ‘ स्वप्नील सावरकर ‘ मोहन वैध , बन्सीलाल कुर्जकार , निलेश चिंचुरकर , आदि महत्वाच्या कांग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपाचा दुप्पट्टा बांधुन भाजपाचे सदस्य बनुन भाजपात प्रवेश केला. त्यामुळे ब्रम्हपुरी कांग्रेसमधे उभी फुट पडली असुन ब्रम्हपुरी कांग्रेसला मोठा झटका बसला आहे. आमदार विजयभाऊ वडेट्टिवार राष्ट्रवादी कांग्रेस की समर्थकांच्या बरोबरीने भाजपात जाणार की कांग्रेसमधेच राहणार अशी जोरदार चर्चा आहे. माजी मंत्री विजयभाऊ वडेट्टिवार गेल्या पाच वर्षापासून सत्तेच्या दुर असल्यामुळे ते नाराजीत आहेत. असे सांगीतल्या जाते की काही दिवसापूर्वी ब्रम्हपुरीत आमदारासोबत भाजपात गेलेले महत्वाचे कार्यकर्ते यांच्यात बैठक पार पडली. यात आपण राष्ट्रवादी कांग्रेस ( अजित पवार ) गटात जायचे ठरले परंतु कांग्रेसच्या काही नेत्यांनी चक्क नकार दिला राष्ट्रवादीत जाण्यापेक्षा भाजपा बरी म्हणुन आमदार विजयभाऊ वडेट्टिवार यांचे खंदे समर्थक विलास विखार सहीत महत्वाचे एकंदरीत ९ कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश करून भाजपाचा दुप्पटा बांधला. आमदार वडेट्टिवार मात्र संध्यातरी भाजपात गेले नाहीत. त्यांची राष्ट्रवादी कांग्रेस अजित पवार गटात जाण्याची इच्छा होती असे बोलल्या जाते. कारण राष्ट्रवादी कांग्रेस ( अजित पवार गटाचे धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला तर मानिकराव कोकाटे हे सुद्धा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. आमदार विजयभाऊ वडेट्टिवार आमदारकीचा राजीनामा देऊन मागच्या दारातुन विधान परिषदेचे आमदार बनुन मंत्री बनण्याचे कदाचित स्वप्न असावे. कारण सत्तेशिवाय राजकारण नाही व पुढील १० वर्ष कांग्रेसचे काही खर नाही असे म्हटले जाते. ब्रम्हपुरी नगर परिषद चे गटनेते विलास विखार , गौरव अशोक भैय्या सहीत जवळपास महत्वाचे कांग्रेसचे ९ कार्यकर्त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे , कार्यालयीन प्रभारी रविंद्र अनासपूरे , आमदार बंडी भागडिया यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष चंदशेखर बावनकुळे यांनी त्यांना शुभेच्छा देऊन पार्टी मजबुत करण्याचे आवाहन केले. आमदार विजयभाऊ वडेट्टिवार आता भाजपात , राष्ट्रवादी कांग्रेस मधे प्रवेश करणार की कांग्रेसमधेच राहणार हे येणारा काळच सांगेल.
