राजेश येसेकर : तालुका प्रतिनीधी भद्रावती

भद्रावती : दि.6 मार्च राज्य राखीव पोलीस दलाचा वर्धापन दिन कार्यक्रमाचा सोहळा पोलीस मदत केंद्र सुरजागड येथे साजरा करण्यात आला. या वर्धापन दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सदर कार्यक्रम राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 4 नागपूरचे समादेशक आदरणीय डॉ. प्रियंका नारनवरे (आयपीएस) यांच्या मार्गदर्शनानुसार हा कार्यक्रम राबवण्यात आला. या रायझिंग डे च्या निमित्ताने हेडरी येथील विनोबा प्राथमिक माध्यमिक आश्रम शाळा या ठिकाणी विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी असलेले शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. तसेच वृक्षारोपण कार्यक्रम ग्रामस्वच्छता अभियान क्रिकेट स्पर्धा हॉलीबॉल स्पर्धा इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले.याप्रसंगी हेडरी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी श्री योगेश रांजणकर साहेब तसेच पोलीस मदत केंद्र , सुरजागड येथील प्रभारी पोलिस अधिकारी श्री विठ्ठल सूर्यवंशी साहेब पोलीस उपनिरीक्षक नारायण सानप साहेब, पोलीस उपनिरीक्षक ज्योती शिंदे मॅडम राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 4 ,डी कंपनीचे प्लाटून कमांडर श्री राजेश सोनेकर साहेब, सहायक फौजदार कोडवते सहाय्यक फौजदार वलके हवालदार राजेश दैवलकर ,हवालदार मिलिंद वडपल्लीवार , हवालदार एस पी ऊईके , हवालदार आर एस पवार, हवालदार विरेंद्र सौंदरकर, हवालदार ए एल लिल्हारे हवालदार डी आर नंदागवळी हवालदार एन ए विजयकर इत्यादी पोलीस अधिकारी आणि अंमलदार या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
