✍️दत्तात्रेय बोबडे
उपसंपादक

वणी :- दिनांक 24/02/2025 रोज सोमवारला बि.आर.जी.एफ हॉल वणी येथे महाराष्ट्र राज्य पदवीधर शिक्षक संघटना जिल्हा यवतमाळ चे जिल्हा अध्यक्ष श्री. महेंद्र वेरुळकर सर यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनात पदवीधर विषय शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी वणी तालुका पदवीधर विषय शिक्षक संघटना कार्यकारणी गठीत करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून देव डेबरे जिल्हा कार्यकारणी सदस्य, महेश खोडके जिल्हा प्रसिद्धीप्रमुख,नरेंद्र परोपटे अध्यक्ष पं.स.बाभूळगाव, विकास दरणे अध्यक्ष पं. स. यवतमाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत वणी तालुका पदवीधर विषय शिक्षक संघटना कार्यकारणी गठीत करण्यात आली.या कार्यकारणीत तालुकाध्यक्ष म्हणून नागोराव ढेंगळे, सचिव संदिप सोनटक्के, कार्याध्यक्ष गजानन जेऊरकर, कोषाध्यक्ष प्रविण ढेंगळे, उपाध्यक्ष लक्ष्मी धुर्वे, उपाध्यक्ष कुसूम डांगे, उपाध्यक्ष कुमुदिनी देवतळे, सहसचिव वासुदेव मल्लुरवार, सहसचिव गजानन तुरारे,सहसचिव महेश सुत्रावे, प्रसिद्धी प्रमुख सुभाष विठ्ठल गेडाम, प्रसिद्धी प्रमुख महिला प्रतिनिधी प्रतिभा खडतकर, जिल्हा प्रतिनिधी विठ्ठलराव पावडे, रमेश बोबडे, मायाताई पेंदोर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन जेऊरकर तर आभार संदिप ठाकरे यांनी मानले. यावेळी तालुक्यातील बहुसंख्य पदवीधर विषय शिक्षक उपस्थित होते.
