✍️मुनिश्वर बोरकर
संपादक
चामोर्शी:-अनुसूचित जमातीवर दिवसेंदिवस अन्याय अत्याचाराचे प्रमाण वाढत असून क्रांतीवीर बाबुराव शेडमाके आदिवासी गोंड समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माणिकराव शेडमाके यांनी आष्टी येथील आदिवासी कॉलनी येथे आदिवासींवर होत असलेल्या अन्यायाला आळा घालण्यासाठी समीक्षा व संशोधन बैठकीचे केले असून असंख्य आदिवासी अन्याय ग्रस्त महिला पुरूष सहाभगी झाले होते त्यापैकी मुलचेरा येथील दिगांबर गावडे तर बंदुकपल्ली येथील किशोर अत्राम यांनी वन हक्क कायद्याअंतर्गत आदिवासी वर होत असलेल्या अन्याया बाबत सांगीतले असता बैठकीला उपस्थित असलेले बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे यांनी सांगीतले की संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार वन हक्क कायद्याचा आधार घेवून पाठपुरावा कऱण्यात आला असून जिल्हास्तरीय वन समितीचा मंजूर 5पट्टा वाटप आधारे उपअधीक्षक भूमिअभिलेख यांच्या कडील प्राप्त क प्रत नुसार अन्वये वन हक्क अधिनियमाच्या कलम 4कंसात 1नुसार प्रदान करण्यात आलेले हक्क वारसाकमी असेल मात्र अन्य संक्रम्य किंवा हस्तांतरीत नाही दिनांक 2 जुलै 2022 रोजी शेकडो वन जमीन धारकांना अधिकार प्राप्त झालेले आहे परंतु मुळ सातबारा अभिलेखात नोंदी झाल्या नसल्यामुळे पुन्हा संघटनेच्या वतीने पाठपुरावा करण्याचे आश्वासन भाई जगदीश कुमार इंगळे यांनी दीले तसेच लगाम माल येथील आदिवासी रमेश पांडुरंग मडावी यांच्या वडिलोपार्जित जमिनीवर गैर आदिवासीं प्रवीण व्यांकटसवामी गोविंदवार धंदा शिक्षक यांनी गैर मार्गाने जमिनीवर कब्जा मिळविला याबाबत बैठकीत समस्या मांडली त्याबाबत भूधारक आदिवासी असल्यामुळे जामीन हस्तांतरण करण्यास कायम स्वरुपी मनाई असताना क्रं -56/ एल एन डी -31,76-77 मौजा लगाम येथील गट क्रं 168एकुन क्षेत्र 2हे 13 आदिवासी हनुमंता गोसाई मडावी ह्यांच्या मालकीची जामीन गैर आदिवासी आनंद स्वामी सत्यनारायण यांच्या कडून ताबा देण्यांत आलेला असताना तसेच आदिवासीला त्याची जामीन परत करण्याचे ऊच्च न्यायालयाचे आदेश असताना आदिवासी हनुमंता गोसाई मडावी यांची जमीन पुनः गैर आदिवासीला का देण्यांत आली तसेच महसूल विभागाचे सचिव शा भा कुलकर्णी यांनी मुंबई मंत्रालयातून आदेश देवून आदिवासी हनुमंता गोसाई मडावी भूमापन 7क्रं 168हि जामीन आदिवासींची आदिवासीला परत मिळावी यासाठी लेखित आदेश देवून सुद्धा आदिवासी यांच्या अज्ञानाचा फायदा घेवुन गैर आदिवासी प्रवीण गोविंदवार हे अन्याय करीत असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे संस्थापक अध्यक्ष माणिकराव शेडमाके यांनी सांगीतले तसेच अल्लापलली मासहत येथील आदिवासी विधवा महिला अर्चांना मडावी हिच्या मालकी हक्काच्या जमिनीवर संस्थानिक अब्दुल हकीम अब्दुल रहीम यांनी गैर मार्गाने कब्जा केला असे अनेक प्रकार गडचिरोली जील्यात आदिवासी लोकांवर होत असून त्याचा पाढा वाढत चाललेला असुन त्याबाबत क्रांतीवीर बाबुराव शेडमाके आदिवासी गोंड समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माणिकराव शेडमाके यांनी विशेष पुढाकार घेवुन आष्टी येथील आदिवासी कॉलनी येथे समीक्षा व संशोधन बैठक घेवुन आदिवासीच्या समस्या ऐकून घेतल्या व यापुढे आदिवासींवर अन्याय होणारं नाही झालाच तर संघटना त्याचा पाठपुरावा करेल अशे आश्वासन माणिकराव शेडमाके यांनी दिले यावेळी बैठकीला मानवी हक्क सुरक्षा दलाच्या राष्ट्रिय कार्यअध्यक्षा डॉ रेखा खंदारे शामादादा कोलाम ब्रिगेड च्या प्रदेश अध्यक्षा सौ इंदिरा बोंदरे शामादादा कोलाम ब्रिगेड चे संस्थापक अध्यक्ष सुरेश कुमरे रमेश मडावी किशोर आत्राम प्रभाकर आलम गणपत मडावी स्वप्नील कोकेरवार सहित आदिवासी महिला पुरुष सहभागी होते
माणिकराव शेडमाके
संस्थापक अध्यक्ष
क्रांतीवीर बाबुराव शेडमाके
आदिवासी गोंड समाज संघटना
9421901859
