संपादक मुनिश्वर बोरकर
गडचिरोली:-कुरखेडा बौद्धगया महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात घ्यावे ह्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी तालुका शाखा कुरखेडाच्या वतीने रिपाईचे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर यांच्या नेतृत्वाखाली तहसिलदार रमेश कुंभरे तहसिल कार्यालय कुरखेडा यांच्या मार्फतीने पंतप्रधान व महामहिम राष्ट्रपती दिल्ली यांना निवेदन देण्यात आले. बौद्धगया येथे तमाम भिक्खुसंघ उपोषण करीत आहेत. ४५ बौद्ध देशांनी पाठींबा दर्शविला आहे. तेव्हा बौद्धगया टेम्पल एक्ट १९४९ चा कायदा बिहार सरकारने रद्द करावा व महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात घ्यावा ह्या मागणीचे निवेदन तहसिलदार कुरखेडा यांना देण्यात आले.
निवेदन देतांना प्रा. मुनिश्वर बोरकर ,ॲड. सि. एम. जनबंधु’ पिरिपाचे प्रमोद भैसार ‘ रिपाईचे उपाध्यक्ष मारोती भैसारे , उपाध्यक्ष दशरथ साखरे ‘ सरचिटणीस सुनिल सहारे , संस्थापक कऱ्हांडे , महिला नेत्या लता सहारे ‘ विलासिनी राऊत , अनिल बांबोळे , गायक विजय शेन्डे , रोशनी लाळे ‘ अशोक अंबादे, ताराचंद नंदेश्वर , मोरेश्वर राऊत , डोमाजी नंदेश्वर , दिनेश वालदे , मंगेश बन्सोड , बबिता रामटेके , हंसराज लाडे , दिपक लाडे , अनिल सहारे , दादाजी रामटेके , भिमराव इंदुरकर , नरेंद्र जांभुळकर , यामिनी जनबंधु’ छाया जनबंधु’ प्रभाताई खोबरागडे , शालीनी राऊत , शामराव लाडे , नरेंद्र जांभुळकर ,सुरेखा गजभिये , संध्या तागडे , शालु प्रमोद सरदारे , सरिता लाडे जयराम ढवळे , जयमाला सहारे ‘ चोखोबा ढवळे , नाजुक भैसारे ‘ सतिश ढेभुर्णे , रमा जनबंधु’ शितल जनबंधु आदि सहीत कुरखेडा तालुक्यातील पिरिपा व रिपाईचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

