✍️मुनिश्वर बोरकर
संपादक
गडचिरोली:-देसाईगंज – श्री महर्षी वाल्मीकी ढिवर समाज संघटना चोप (वडसा) येथे श्री महर्षी वाल्मिकी ऋषी प्राणप्रतिष्ठा सोहळा दिनानिमित्य समाज प्रबोधनाचा कार्यक्रम उद्या दि. २८ फेब्रुवरी २०२५ दुपारी १२ वाजता बगिच्छा रोड चोप येथे आयोजित करण्यात आलेले आहे. कार्यक्रमाचे उदघाटक आमदार रामदास मसराम सहउद्घाटक माजी प .स सभापती वडसा परशराम टिकले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष नानाभाऊ नाकाडे माजी जि.प सभापती , उपाध्यक्ष सरपंच नितिन लाळे तर मार्गदर्शक म्हणुन माजी सभापती चंद्रलालजी मेश्राम , भाग्यवान मेश्राम ,जुम्मन शेख वडसा , ढिवर समाजाचे सचिव किशोर बावणे आदिची उपस्थिती लाभणार आहे तरी सदर कार्यक्रमास बहुसंख्येनी उपस्थित राहण्याचे आवाहन वाल्मिकी ढिवर समाज बांधव चोप (वडसा) यांनी केलेले आहे.
