गवराळा प्रभाग वासियांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन .
राजेश येसेकर ✍️तालुका प्रतीनिधी भद्रावती
भद्रावती : शहरातील गवराळा प्रभागातील स्मशानभूमी अनेक समस्यांनी ग्रासलेले असल्याने येथे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या शोकाकुल नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आहे. त्यामुळे या स्मशानभूमीत विविध सुविधा उपलब्ध करून स्मशानभूमीचे सौंदर्यीकरण करावे अशी मागणी गवराळा प्रभागातील नागरिकांनी नगर परिषदच्या मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळखी यांना दिनांक.२० रोज गुरुवारला सकाळी ११.३० वाजता सादर केलेल्या निवेदनातून केली आहे.
सदर स्मशानभूमीतील एक दहन शेड पूर्णपणे जीर्ण असल्याने एकाच दिवशी एकापेक्षा अधिक अंत्ययात्रा आल्यास मृतात्म्याच्या नातेवाईकास व नागरिकांना ताटकळत राहावे लागते. तसेच परिसरात काटेरी झुडपे व अस्वच्छता असल्याने रात्रीच्या वेळी साप विंचू पासून नागरिकांना धोका होण्याची भीती असते. तसेच गणेश मंदिर परिसरात रेल्वे लाईन कडे जाण्याच्या मार्गावर मोठे खड्डे असल्याने अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व समस्या लक्षात घेता रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी. तसेच स्मशानभूमीत आवश्यक सोई सुविधा पुरवून नागरिकांना दिलासा देण्यात यावा, अशा आशयाचे निवेदन चुटकी बहुउद्देशीय विकास संस्था भद्रावती तर्फे सादर करण्यात आले. यावेळी चुटकी बहुउद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष लिमेश माणूसमारे, शिवसेना उपशहर प्रमूख मनीष बूच्चे, तेजकरन बदखल, दीपक बदखल सुनील आवारी, प्रथम गेडाम, विनोद सावनकर, बाबाराव निखाडे, बंडू परचाके, प्रभाकर निमकर, मंगेश येरमे, आदी नागरिक उपस्थित होते. यावेळी योग्य तोडगा काढू असे मुख्याधिकाऱ्यांनी आश्वासन दिले.

