प्रतिसाद गल्लीपासून दिल्लीपर्यंत शेकडो स्पर्धकांनी नोंदविला विक्रमी सहभाग.
अमरावतीची कुमारी नभा फांजे ठरली प्रथम पारितोषिकाची मानकरी, तर द्वितीय आशिष कैठवास तर तृतीय गोपाल सिंह ठाकुर
दत्तात्रेय बोबडे
उपसंपादक
पातूर : अकोला जिल्ह्यातील एकमेव सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेली तसेच महाराष्ट्रातील शेकडो नवोदित गायक कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारी अकोला जिल्ह्यातील एकमेव द प्रोफेशनल करिअर अकॅडमी बहुउद्देशीय शैक्षणिक संस्था पातुर, जिल्हा अकोला यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी पातुर शहरात महाराष्ट्रातील सर्वात मोठी भव्य खुली राज्यस्तरीय कराओके गीतगायन स्पर्धा संस्थेचे संस्थाध्यक्ष ॲड. पंकज सुरेश पोहरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.या भव्य राज्यस्तरीय गीतगायन महास्पर्धेला प्रमुख आकर्षन असलेले विदर्भाचे रत्न आदित्य पोहरे यांच्या विशेष सहकार्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. व संपूर्ण आयोजक समितीला प्रेरणा मिळाली. त्याचबरोबर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित असलेले पातूर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार हनुमंत डोपेवाड,मुंबई आर.एफ.ओ सिद्धार्थ वाघमारे हे उपस्थित होते. त्याचबरोबर पातुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक दीपक धाडसे उपस्थित होते. युवा लोक चळवळचे संस्थापक अध्यक्ष अमोल घायवट, मा.राजेशजी तेलमोरे अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक.अकोला अभिनव शेती विकास मंडळाचे अध्यक्ष दिनेश पोहरे , ॲड.बाळकृष्ण वानखडे, पातूर पोलीस स्टेशनचे पी.एस.आय बंडू मेश्राम, पो.कॉ.निलेश राठोड इत्यादी प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे संस्थाध्यक्ष ॲड.पंकज पोहरे यांनी केले.सदर कार्यक्रमाची सुरुवात सुप्रसिद्ध पार्श्वगायक मोहम्मद रफी,भारतरत्न लता मंगेशकर , किशोर कुमार यांच्या प्रतिमांना हारअर्पण व दीपप्रज्वलन करून विशेष मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
पातूर नगरपरिषद चे माजी नगराध्यक्ष हिदायत खान, पातूरचे माजी नगराध्यक्ष सय्यद मुजाहिद सै. मोहसीन , मंगल डोंगरे ग्रामपंचायत सदस्य शिर्ला, रामाराव बोदडे ग्रामपंचायत माजी सरपंच कार्ला, बृहन्मुंबई गजानन राठोड, माळराजुरा माजी सरपंच गणेश राठोड, ग्रामपंचायत सदस्य फिरोज खान इत्यादी मान्यवरांनी विशेष सहकार्य केले.
राज्यस्तरीय गीतगायन महास्पर्धेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रतिसाद मिळाला.प्रतिसाद इतका होता की या ऐतिहासिक स्पर्धेचा निकाल रात्री एक वाजता जाहीर करण्यात आला. एवढेच नाही तर दिल्ली, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, आसाम, उत्तराखंड, भोपाळ, उत्तर प्रदेश, पंजाब अशा विविध राज्यांमधून सुद्धा प्रतिसाद होता.
महाराष्ट्रातील तमाम गायक कलावंत तसेच नवोदित या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते.
ऑडिशन फेरीमध्ये ११४ पात्र स्पर्धकांची निवड करण्यात आली. त्यानंतर महाअंतिम फेरी मध्ये वेळेवर आलेल्या स्पर्धकांचा सुद्धा विचार करण्यात त्यामधून निवडलेल्या २७ स्पर्धकांची प्रत्यक्ष सेमी फायनल राऊंड घेण्यात आला. त्यामध्ये अमरावतीची कुमारी नभा नितीन फांजे हिला महाराष्ट्राचा प्रथम पारितोषिक २१,००० हजार व आकर्षक असलेली ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतर द्वितीय पारितोषिक १५,००० यवतमाळचा आशिष कैठवास , तर तृतीय पारितोषिक १०,००० नागपूरचा गोपाल सिंह ठाकुर , व चतुर्थ पारितोषिक ५,००० अमरावतीची कावेरी खर्डे यांना रोख रक्कम , प्रमाणपत्र, आकर्षक असलेली ट्रॉफी दिग्गज मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.सदर स्पर्धा ही अकोला जिल्ह्यातील पातुर शहरात दिनांक १६ मार्च २०२५ रविवार रोजी सकाळी ठीक दहा वाजता पासून सुरू होत झाली.
या ऐतिहासिक स्पर्धेला यशस्वी करण्याकरिता विविध प्रकारच्या समित्या भोजन समिती, स्वागत समिती, नाव नोंदणी समिती ,विशेष सहकार्य नियोजन समिती प्रमुख अविनाश पोहरे, प्रमुख सह समन्वयिका अरुणा वानखडे, निखिल उपर्वट, इंजि.सतिश हातोले यांनी मोलाचे सहकार्य केले तर सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता तुषार शिरसाठ, ॲड.प्रवीण पोहरे, कु. नेहा शेगोकार,आकाश उपर्वट, शिलवंत उपर्वट, अविनाश उपर्वट, महावीर अवचार,करण राठोड,मनोहर पोहरे, राजेश देशमुख, निलकंठ गोतरकर, दीपक ढाकोलकर,निलेश पोहरे, वसिम शेख शरद हातोले, पंजाब हातोले, अनिकेत हातोले, अतुल हातोले, विशाल हातोले, गणेश बोंबटकर, अजिंक्य निमकंडे, प्रल्हाद नीलखन,यांनी अथक परिश्रम घेतले.तसेच नियोजन समिती मधील सर्व सदस्यांचे मोलाचे योगदान लाभले.
विशेषत पातुर पोलीस प्रशासनाने विशेष सहकार्य केले.त्याचबरोबर या राज्यस्तरीय कराओके गीत गायन महास्पर्धेला अकोल्याचे दिग्गज ज्येष्ठ परीक्षक म्हणून लाभलेले डॉ.किशोर देशमुख, डॉ.नाना भडके ,डॉ.हर्षवर्धन मानकर यांनी उत्तमरीत्या परीक्षण केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रवीण देशमुख यांनी कार्यक्रमाची धुरा सांभाळली.
भविष्यामध्ये ही स्पर्धा राष्ट्रीय पातळीवरची होणार असे मत संस्थेचे संस्थाध्यक्ष ॲड.पंकज पोहरे यांनी व्यक्त केले आहे.


