संपादक मुनिश्वर बोरकर
सिरोंचा:-सिरोंचा येथील नेहरू चौकातील बसस्टॅड जवळील रोड च्या कामात अडथळा निर्माण करणारी भिंत हटवून बंद पडलेले रोडचे काम पुढे न्यावे अन्यता आरपीआय च्या वतीने तिव्र आंदोलन करण्याचा ईशारा आरपिआय सिरोंचा विधानासभा प्रमुख शंकर अण्णा शनीगपूर सिरोंचा , रिपाई प्रमुख गोपाल रायपुरे , प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी दिला आहे. सिरोंचा मुख्य चौकात तत्कालीन पालकमंत्रीच्या निधितुन महेश तिवारी यांच्या सहकार्याने सदर भिंत बांधण्यात आली त्यावेळेस मोठा रोड होणार यांची कल्पना नसावी परंतु आता महाराष्ट्र नगरोध्यान महा अभियान योजने अंतर्गत नगरम ( कालेश्वर )टर्निंग कडे जाणारा ८० फुटाचा रोड ला मंजुरी मिळाली असुन सदर कामाची अंदाजी किमंत एक कोटीच्या घरात असुन संध्या ठेकेदाराकडून बांधकाम सुरु आहे परंतु सदर रस्त्याचे काम पुढे नेण्यासाठी सदर भिंत अडथळा ठरत आहे. संबंधित ठेकेदार भिंत पाडायला कचरत आहे तर नगर पंचायत ने कारवाई करून हटवावी परंतु नगरपंचायत कडून मांजरीच्या गळाला घंटा कोण बांधणार ! असे सुरु आहे.सदर भिंत तोडल्या शिवाय पुढे रोडचे काम होणार नाही उर्वरीत बांधकामाचे पैसे रोड न बनविताच ठेकेदारांच्या घस्यात जातील ठेकेदार व नगर प्रशासन सिरोंचा नागरिकांची दिशाभुल करीत आहेत. झाडाच्या सभोवतालची रोड च्या दिडफुट भिंत समोर आली आहे. त्यामुळे नगर प्रशासनाने पुढाकार घेऊन व ठेकेदारांना सहकार्य करून भिंत पांडून रोड पुढे न्यावा अन्यता असे न झाल्यास आरपीआय तीव्र आंदोलन करेल अशा इशारा ही शंकर अण्णा सिरोंचा यांनी दिलेला आहे.

