संपादक
मुनिश्वर बोरकर
गडचिरोली:सावली – सावली तालुक्यातील व्याहाड (बाजार) येथील पंचशिल बुद्ध विहार व्याहाड येथे तथागत भगवान बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापणा व नविन विहार बांधकामाचे भूमिपूजन मंगळवार दि. १५ एप्रिल २०२५ दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात आलेले आहे. सदर कार्यक्रमाचे उदघाटक भन्ते सुचित बोधी व भिक्खुगण चंद्रपूर यांचे शुभ हस्ते पार पाडण्यात येणार असुन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ॲड. विनय बांबोळे गडचिरोली तर प्रमुख पाहुणे तथा मार्गदर्शक म्हणुन रिपब्लिकन पार्टी चे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष गोपाल रायपूरे , आरपिआय गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर , सामाजिक कार्यकर्ता खुशाल तेलंग सर चंद्रपूर , एन. डी पिंपळे , रिपाई नेते शिद्धार्थ सुमन भद्रावती ॲड. प्रियंका चव्हाण बल्लारसा , रिपाई नेते कोमल रामटेके चंद्रपूर तर प्रमुख अतिथी म्हणुन माजी जि.प. सदस्य दिनेश चिटनुरवार ,निखिलभाऊ सुरमवार , सरपंचा सुनिता उरकुडे व्याहाड प्रा. अपेक्षा पिंपळे चंद्रपूर , ग्रामसेवक प्रफूल गेडाम ,पुंडलिक मडावी व्याहाड , समाजाचे अध्यक्ष राजेश बांबोळे व्याहाड , आदि लाभणार असुन रात्रौ ८ वाजता गायक विजय शेन्डे यांचा प्रबोधनपर कार्यक्रम होणार आहे. तरी होवु घातलेल्या कार्यक्रमास बहुसंख्येनी उपस्थित राहण्याचे आवाहन पंचशिल बौद्ध समाज मंडळ व्याहाड च्या पदाधिकाऱ्यांनी केलेले आहे.


