संपादक मुनिश्वर बोरकर
कुरखेडा:-रिपब्लिकन पार्टीची कुरखेडा तालुका बैठक दादाजी रामटेके भवन कुरखेडा येथे रिपाईचे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर यांच्या अध्यक्षेखाली पार पडली. तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी रिपाईचे जिल्हा उपाध्यक्ष मारोती भैसारे ‘ ॲड. सि एम . जनबंधु ,रिपाईचे जिल्हा उपाध्यक्ष दशरथ साखरे ‘ जिल्हा उपाध्यक्ष डोमाजी नंदेश्वर , पिरिपा तालुकाध्यक्ष प्रमोद सरदारे , जिल्हा सरचिटणीस सुनिल सहारे , रिपाई नेते संस्थापक चरणदास कऱ्हाडे , तालुका महिला अध्यक्षा लता सहारे आदि लाभले होते .
याप्रसंगी प्रा. मुनिश्वर बोरकर म्हणाले की , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या खुल्या पत्रावर आधारित रिपब्लिकन पक्ष त्याचे कार्यकर्ते जिल्हयात मोठ्या प्रमाणात आहेत. निवडणुकीत नेहमीच कांग्रेसला साथ देतात परंतु अनु.जातीवर जेव्हा केव्हा अन्याय अत्याचार होतो तेव्हा कांग्रेसवाले साथ देत नाही. फक्त मताचा जोगवा मागण्यासाठी कांग्रेसवाले आहेत. भाजपा – कांग्रेस एकाच माळेचे मनी आहेत. म्हणुन रिपाई कार्यकर्त्याने ताक फुकुन प्यायला पाहिजे . याप्रसंगी मारोती भैसारे , ॲड. सि .एम जनबंधु , सुनिल सहारे , लता सहारे आदिची भाषणे झालीत
कार्यक्रमाचे संचालन गायक विजय शेन्डे यांनी तर आभार प्रमोद सरदारे यांनी मानले. कार्यक्रमास महिला तालुका सचिव विलासिनी राऊत , महिला शहर अध्यक्षा सुरेखा गजभिये , युवा अध्यक्ष मंगेश बन्सोड अनिल बांबोळे ,रोशनी लाळे ‘ अशोक अंबादे, उपाध्यक्ष ताराचंद नंदेश्वर , मोरेश्वर राऊत , डोमाजी नंदेश्वर , दिनेश वालदे, बबिता रामटेके , हंसराज लाडे , दिपक लाडे , अनिल सहारे , दादाजी रामटेके , भिमराव इंदुरकर , नरेंद्र जांभुळकर , यामिनी जनबंधु’ छाया जनबंधु’ प्रभाताई खोबरागडे , शालीनी राऊत , शामराव लाडे , नरेंद्र जांभुळकर , रमेश जोगे , संध्या तागडे , शालु प्रमोद सरदारे , सरिता लाडे जयराम ढवळे , बालक भानारकर , शतिश राऊत , जयमाला सहारे ‘ चोखोबा ढवळे , सतिश जनबंधु ,नाजुक भैसारे ‘ सतिश ढेभुर्णे , रमा जनबंधु’ शितल जनबंधु , शालीनी राऊत , संध्या नागरे , आशा राऊत ,आदि सहीत कुरखेडा तालुक्यातील पिरिपा व रिपाईचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

