✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
चंद्रपूर :– देशात आणि राज्यातील वाढता हिंसाचार, गुंडाराज, बेरोजगार युवक, शेतकरी, शेतमजूर, महिलांवरील अन्याय, सामाजिक तेड कुठे तरी थांबले पाहिजेत आणि निष्क्रिय सरकारला जाग आली पाहिजे यासाठी गांधीवादी मार्गाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने पुणे ते मुंबई युवा आक्रोश पदयात्रा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत, राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू, प्रभारी अजय छिकरा, कूमार रोहीत, एहसान खान यांच्यास सर्व जिल्ह्य़ातील युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष तथा युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या लक्षणीय उपस्थितीत काढली होती. यात जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे यांच्या नेतृत्वाखाली चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठय़ा संख्येने सहभाग घेतला. राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रेरित होऊन या पदयात्रेत या महामानवांचे फोटो घेऊन तसेच चंद्रपूर जिल्ह्य़ातील मूर्ती विमानतळ लवकर पूर्ण झाले पाहिजे, महिलांना संजय गांधी निराधार योजनेचे पैसे भेटले पाहिजे, जिल्हा प्रदूषण मुक्त झाला पाहिजे, स्थानिक युवकांना रोजगार मिळाले पाहिजे, चंद्रपूर RTO चा भ्रष्टाचार थांबलाच पाहिजे यासह अनेक स्थानिक समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले. यावेळी चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे यांनी गांधीवादी मार्गाने सुरु करण्यात आलेल्या युवा आक्रोश पदयात्रेवर सरकारने दडपशाही तथा बलाचा वापर करून आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयत्न केला हे संविधान विरोधी असून याचा त्यांनी तिव्र शब्दात निषेध केला आहे. तसेच युवक काँग्रेस इथेच थांबणार नसून येणाऱ्या काळात युवक काँग्रेस सर्व सामान्य जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी अधिक आक्रमक पवित्रा घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

