✍️दत्तात्रेय बोबडे
उपसंपादक
वरोरा:- वरोरा येथे दिनांक १५ मार्च २०२५ ला मान्यवर कांशीराम यांचा ९१ वा जयंती समारोह बहुजन विचार मंच वरोरा द्वारा महात्मा जोतिबा फुले विचारमंच आंबेडकर चौक वरोरा येथे रामचंद्र सालेकर, राज्य उपाध्यक्ष,शिक्षणमहर्षी डॉ.पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद महाराष्ट्र यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला. कार्यक्रमाचे उदघाटक डॉ. विराज टोंगे माजी जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड चंद्रपूर तर प्रमुख मार्गदर्शक नरेंन गेडाम एस.ई.एम. चंद्रपूर, प्रबोधनकार इंजि. प्रकाश पिंपळकर मारकीकर यवतमाळ, बहुजन विचार मंचचे प्रमुख तथा कार्यक्रमाचे आयोजक ऍड. रोशन नकवे, सामाजिक कार्यकर्ते सुखदेव अंबुरकर,पी.एम.डांगे, वसंत लिपटे, यशवंत सायरे,भास्कर कुडे, मुस्ताक अली,संजय बिरिया,साबणभाई,छायाताई धोटे यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक नरेन गेडाम यांनी बहुजन नायक मान्यवर कांशीराम यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकतांना बहुजनांच्या उद्धारासाठी असलेल्या फुले शाहु आंबेडकरांच्या समतामुलक विचारधारेपासून बहुजन समाज दूर का? असा प्रश्न करून खंत व्यक्त केली.
. रामचंद्र सालेकर यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात वेळेअभावी अगदी थोडक्यात परंतु मार्मिक शब्दात मान्यवरांनी व्यक्त केलेल्या विचारांचा सार मांडून बहुजनांच्या व्यथांची नेमकी कारणे स्पष्ट करतांना सांगितले की या देशात हत्तीची ताकद असलेल्या बहुसंख्य समाजावर चिटी एवढा मनुवादी समाज राज करत असण्याचं खरं कारण हा बहुजन समाज विशेषतःओबीसी वर्ग हा मनुवादच्या जाळ्यात फसला आहे. मनुवाद म्हणजे विषमतेच जहर भरलेली बहुजनांच्या मेंदूला देण्यात येणारी मनुवाद्यांनी शोधून काढलेली लस की ज्यात धर्मांधता,जात्यांधता,विषमता,अंधश्रद्धा,पाखंड,दैववाद,कर्मकांड अशी विषारी रसायने आहेत ज्यामुळे बहुजन समाज मानसिक पंगू झाला आहे.मनुवादी जहराचा बहुजनांच्या मेंदूवर एवढा दुष्परिणाम झाला की आपल्या महामानवांनी सांगितलेले कल्याणकारी विचार अगदी उलट वाटायला लागले जसे बहुजन हा शब्द आम्हाला अल्पजन वाटतो, बुद्ध म्हणजे ज्ञानी परंतु अज्ञानाला बुदधू शब्द वापरून बहुजनांच्या डोक्यात घातला गेला.बहुजनांचा पूर्वज सात काळजात जपवा असा प्रजेला सामान वाटा देणारा सविभागी आदर्श बळी राजा बहीण आजही भावाला ओवाळाताना इडा पीडा जाओ बळीच राज्य येवो अशी प्रार्थना करते त्या बळी बद्दल मनुवाद्यांनी ज्याला कापायचं असते तो बळी असं बहुजनांच्या डोक्यात घुसवलं,या मनुवादी जहाराने आपलेच महामानव त्यांचे विचार आपल्याला परके वाटायला लागले. त्यामुळे हत्ती सामान मोठमोठी जड उखडून फेकण्याची ताकद असलेल्या बहुजन समाजाची दैना जशी एखाद्या हत्तीला छोटा असतांना बारीक रस्सीने छोट्याशा खुंटाला बांधून ठेवण्याची सवय जडली की तो मोठा होऊन त्या हत्ती मध्ये महाकाय वृक्ष उखडून फेकण्याची ताकद असली तरी ती रस्सी तो तोडू शकत नाही, ती छोटीशी खुंटी सुद्धा तो उपडू शकत नाही अशी महाकाय हत्तीची ताकद असणाऱ्या बहुजन समाजाची अवस्था झाली आहे. जोपर्यंत बहुजन समाज मनुवादाची खुटी उपडून फेकत नाही, मनुवाद्यांच्या तोडा फोडा राज्य करा या कपटी विदेश नीतीपासून बहुजन सावध होत नाही तोपर्यंत राजसत्ता,धर्मसत्ता,अर्थसत्ता,न्यायसत्ता,प्रचार-प्रसार माध्यम सत्ता बहुजनांच्या हाती येणार नाही या सत्ता बहुजनांच्या हाती येईल तेव्हाच खऱ्या अर्थाने भारतीय बहुजन समाज स्वतंत्र झाला,शिव-फुले-शाहु-आंबेडकर-कांशीराम यांचे स्वप्न साकार झाले असे म्हणता येईल, तेव्हा बहुजनांनी मनुवादी जहरापासून,त्यांच्या कपटकरस्थानापासून सावध व्हावं. छत्रपती शिवरायांनी बहुजनांना एकत्र करून स्वराज्य निर्माण केलं तसं परत एकदा बहुजनांचं राज्य यावं अशी अपेक्षा आपल्या अध्यक्षीय भाषणात रामचंद्र सालेकर यांनी व्यक्त केली.
बहुजन विचार मंचाच्या वतीने बहुजन विचारवंत तथा सामाजिक कार्यकर्ते सुधाकर चौखे सर,तेलंग सर, लिपटे सर, साबण भाई, प्रबोधनकार पिंपळकर महाराज यांचा सन्मान चिन्ह व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.
मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, तथा ईजी. प्रकाश पिंपळकर महाराज याच्या प्रबोधनाने कार्यक्रमांची सांगता झाली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड. रोशन नकवे यांनी केले तर आभार गजभिये सर यांनी केले.

