गडचिरोली संपादक मुनिश्वर बोरकर
गडचिरोली:-दिनांक 22 मार्च रोज शनिवार ला लॉयन्स क्लब गडचिरोली तर्फे झोन चेअरपर्सन व रिजन चेअरपर्सन भेट तसेच डिस्ट्रिक्ट गव्हर्नर यांच्या भेटीचे आयोजन गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती बँक सभागृह ,धानोरा रोड येथे करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरवात महाराष्ट्र राज्यगीताने व गणेश वंदनाने करण्यात आली.
कार्यक्रमात डिस्ट्रिक्ट चे स्लोगन “मानवता हाच खरा धर्म” यावर प्रा संध्या येलेकर यांनी रांगोळीच्या माध्यमातून सुंदर असे स्लोगन चे चित्र रेखाटले होते तसेच माजी अध्यक्ष सतीश पवार यांच्या कल्पनेतून गडचिरोलीच्या आदिवासी संस्कृतीला जपत रीना उईके हिने तयार केलेल्या सिंधीच्या पानाच्या मुकुटाने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी पाहुण्यांच्या स्वागतार्थ गार्गी दीपक मोरे हिने मनोवेधक नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
क्लबची कार्यप्रणाली तपासणी साठी आणि क्लब च्या सदस्यांना प्रोत्साहित व मार्गदर्शन करण्यासाठी सदर भेटीचे आयोजन करण्यात आलेले होते. क्लब ला भेट देण्यासाठी झोन चेअरपर्सन दीपक मोरे, रिजन चेअरपर्सन डॉ.श्रीकांत जोशी तसेच डिस्ट्रिक्ट गव्हर्नर पीएमजेएफ डॉ. रिपल राणे उपस्थित होते.
डॉ. रिपल राणे यांनी सांगितले की, लायन्स क्लब इंटरनॅशनल ही जगातील सर्वात मोठी सामाजिक संस्था असून आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदत करण्यासाठी सरकारच्या अगोदर लायन्स क्लब तिथे पोहोचते, गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा लायन्स क्लब ने दोन वेळा पूरग्रस्तांना मोठी मदत केली आहे. हा जिल्हा आजही अनेक मूलभूत सुविधा पासून कोसो दूर आहे येथे सेवेची फार मोठी संधी असून “मानवता हाच खरा धर्म ” या भावनेतून क्लब ने सेवा द्यावी आणि लायन्स क्लबचे कार्य समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवावे असे आवाहन केले.
यावेळी नवीन सदस्य डॉ. बिडकर,अनिल धाईत, नितीन मुलकलवार आणि शेखर आखाडे ह्यांना लायन्स क्लब ची पिन देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच ज्या सदस्यांनी लायन्स क्लब मध्ये 15 ते 20 वर्ष सेवा दिली त्यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी डॉ रिपल राणे यांच्या हस्ते क्लब च्या अध्यक्षा मंजुषा मोरे ह्यांना मल्टिपल मधून प्रोत्साहन पर प्रमाणपत्र देऊन, सचिव नितीन चंबुलवार ह्यांना ऍक्टिव्हिटी रिपोर्टिंग करीता , कोषाध्यक्ष इंजि. गणेश परदेशी ह्यांना एमजेएफ अवॉर्ड ने तसेच कॅबिनेट ऑफिसर शेषराव येलेकर व नादिर भामिनी यांना डिस्ट्रिक्ट ची विशेष पिन देऊन सन्मानित करण्यात आले.
पाहुण्यांची ओळख नंदिनी चीलमवार, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संध्या चिलमवार तर आभार सचिव नितीन चेंबूलवार यांनी मानले . कार्यक्रमाला लायन्स सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

