राजेश येसेकर ✍️ तालुका प्रतिनिधी भद्रावती,
भद्रावती : मिळालेल्या एका गोपणीय माहितीच्या आधारे वनक्षेत्रात अवैध रेतीची तस्करी करणारे चार ट्राक्टर जप्त करण्यात आले आहे. सदर कारवाई भद्रावती वनपरीक्षेत्राद्वारे आज दि. पाच रोज शनिवारला सकाळी सात वाजता वनपरीक्षेत्रातील मासळ व तिरवंजा नियत क्षेत्रात करण्यात आली.
सदर नियत क्षेत्रात अवैध रेती तस्करी होत असल्याची गोपणीय माहिती वनविभागाला मिळाल्यानंतर वनविभागाचे पथक सदर ठिकाणी पोहचले. त्यावेळी या नियत क्षेत्रातील नाल्यातुन एम एच 34 बिएफ 2523, एम एच 33 एफ 4014, एम एच 34सीडी 4698व एक नंबर नसलेले ट्राक्टर असे चार ट्राक्टर अवैध रेती तस्करी करीत असलेले आढळुन आले. त्यांच्याजवळ परवाना मागितला असता तो आढळून आला नाही. त्यामुळे हे चारही ट्रॅक्टर जप्त करून ट्रॅक्टर मालक अनुक्रमे ओम पिंपळकर, राहनार तिरवंजा , अनुप येरगुडे राहणार तिरवंजा, रुपेश उईके राहणार आष्टी, यांचेवर वन गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर कारवाई वनपरीक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली व्ही व्ही शिंदे, ए बि शेळकी, एस एस मेश्राम, जे एम माहुलीकर, डि एम गेडाम, पवन मांढरे, नितीन राऊत, किशोर मडावी, अनिल शेंद्रे, विकास धांडे यांनी केली.
