✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
राजुरा:-आदिवासी महानायक वीर बाबूरावजी शेडमाके याच्या जयंती निमित्त बेघरवस्ती, राजुरा येथे त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करून गोंडी ढेमसा नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी उद्घाटनपर मार्गदर्शनात त्यांनी सांगितले की, वीर बाबुराव शेडमाके यांनी आदिवासी तसेच शोषित पिडीत समाजाच्या स्वातंत्र्यासाठी, विकासासाठी संघर्ष केला. त्यांचे कार्य व विचार स्विकारुन समज बांधवांनी प्रगती केली पाहिजे. याचसाठी त्यांची प्रेरणा मिळावी म्हणून आपण येथे वीर बाबुराव शेडमाके यांचा पुतळा उभारण्यासाठी पुढाकार घेतला तसेच येणाऱ्या काळात आपण एक सुंदर सभागृह येथे निर्माण करणार आहोत असे सांगितले.
या प्रसंगी स्थानिक आदिवासी विद्यार्थ्यांनी, नागरिकांनी गोंडी ढेमसा नृत्य तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्यांना पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी राजुराचे आयपीएस आधिकारी हिरडे, माजी नगरसेवक हरजीतसिंग संधु, कोटणाके सर, अभिजित धोटे, रवी अत्राम, कुलमेथे सर, महिपाल मडावी यासह आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्तीत होते.

