✍️मुनिश्वर बोरकर
संपादक
कुरखेडा:- मालेवाडा पोलीस स्टेशन हद्दितील धनेगाव येथील कालीदास पांडुरंग मोहुर्ले वय ४o वर्ष यांच्या घरातून ४० किलो व कातलवाडा येथील तारेश्वर भुपाल चांग वय ३४ यांच्या घरातुन १० किलो गांजा पोलीसांनी हस्तगत करून अमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई केली.
स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपणीय माहितीच्या आधारे जिल्हा पोलीस अधिक्षक निल्लोपल यांच्या मार्गदर्शनाखाली मालेवाडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार आकाश नाईकवाडे व त्यांच्या सहकार्याऱ्यांनी सदरची कारवाई करून अधिक तपास सुरु आहे.दोन्ही आरोपीने पावसाळ्यात विक्रीच्या उद्देश्याने घरात गांजा साठवून ठेवल्याची कबुली दिल्यामुळे त्यांना तिन दिवसाची पोलीस कोठडी सुनाविण्यात आली. अधिक तपास सुरु आहे

