संपादक मुनिश्वर बोरकर गडचिरोली
गडचिरोली:-गडचिरोली – पोर्ला मार्गावरील काटली पुलाजवळील काटली येथील व्यायाम करायला गेलेले सहा युवकांना एका अज्ञान ट्रकने चिरडल्यामुळे त्यापैकी चार युवकांचा मृत्यु झाला व दोन युवक गंभीर जखमी झाले तर जखमींना हेलिकॉप्टरने नागपुरला हलविण्यात आले.
हृदयाला हेलावून टाकणारी घटना घडल्यामुळे काटली गावात शोककळा पसरली होती. शिक्षणमंत्री दादा भुसे हे गडचिरोली जिल्हयात नियोजित दौऱ्यावर आले असता सदर घटना माहीत होताच जिल्हाधिकारी कार्यालयात शोकसभा घेण्यात आली व लगेचच मंत्री दादा भुसे आमदार डॉ. मिलिंद नरोटे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा घटनास्थळी पोहचले मृत्युमुखी पडलेल्या युवकांच्या कुंटबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व जखमीची भेट घेऊन विचारपुस केली.
ग्रामस्थांच्या भावना समजुन घेऊन शांतता राखण्याचे आवाहन केले मृत्युकांच्या कुटुंबात शासन तुमच्या दुःखात सहभागी असुन मृत्युकांचा नातेवाईकांना व जखमींचा सर्वतोपरी मदत केल्या जाईल असे आश्वासन मंत्री दादा भुसे यांनी दिले.

