✍️मुनिश्वर बोरकर संपादक
गडचिरोली:-मुस्लिमांवरील होणारे अन्याय अत्याचार रोखण्यासाठी मुलनिवासी बहुजन समाजाचे सहकार्य घेतल्याशिवाय पर्याय नाही असे राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा नईदिल्ली चे राष्ट्रीय प्रभारी चांद मोहम्मद यांनी म्हटले . ३९ वे बामसेफ , राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे राज्य अधिवेशन २४ ऑगस्टला भुसावळ येथे होत आहे . या अधिवेशनाला मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित रहावे यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर चांद मोहम्मद प्रभारी राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा नई दिल्ली , दिपक वासनिक राष्ट्रीय समिक्षा प्रभारी बामसेफ नई दिल्ली , प्रा . मनोज लोहे पूर्व विदर्भ प्रभारी बामसेफ हे विदर्भ दौऱ्यावर आले असता ते गडचिरोली जिल्हयातील जनता मोठ्याप्रमाणात उपस्थित रहावी यासाठी शासकिय विश्वाम गृह इंदिरा गांधी चौक येथे गडचिरोली जिल्हयातील कार्यकर्त्यांची व समविचारी पक्षाची बैठक घेतली. यावेळी बामसेफचे राष्ट्रीय समिक्षा प्रभारी प्रा दिपक वासनिक म्हणाले की, सरकार ईव्हीएम च्या भरोशावर निवडून येते त्यामुळे सरकार जनतेला गुलामीकडे नेत आहे निवडणुका ईव्हीएम न घेता बायलेट पेपरवर घ्यावे यासाठी भारतभर आंदोलन करणारे बामसेफ चे कार्यकर्ते होत. प्रा . मनोज लोहे पूर्व विदर्भ प्रभारी बामसेफ म्हणाले की , जनतेला त्यांच्या गुलामीची जाणीव करून दिल्याशिवाय ते बंड करणार नाही व गुलामितून मुक्त होणार नाही.
या सभेला बामसेफचे जिल्हाध्यक्ष भोजराज कान्हेकर , आरपिआयचे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर , उपाध्यक्ष मारोती भैसारे बामसेफचे जिल्हाप्रभारी नरेश बांबोळे , राष्ट्रीय किसान मोर्चाचे जिल्हा प्रभारी प्रमोद राऊत , भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष जनार्धन ताकसांडे आरपिआयचे उपाध्यक्ष दशरथ साखरे , बहुजन मुक्ती पार्टीचे डोमाजी गेडाम , शांतीलाल लाडे , प्रोटानचे पुंडलिक शेंडे , असंघटीत कामगारचे हेमंत बारसागडे , बहुजन मुक्ती पार्टीचे नरेंद्र शेंडे , राष्ट्रीय किसान मोर्चीचे जिल्हाध्यक्ष जयंत गेडाम , बहुजन मुक्ती पार्टीचे सचिव खेनचंद इंदूरकर , दामोधर शेंडे , अतुल बडोले , मदनउराडे , इत्यादि प्रमुख कार्यकर्त उपस्थित होते

