संपादक मुनिश्वर बोरकर गडचिरोली
गडचिरोली:-वडसा तालुक्यातील विसोरा – सांवगी सर्कलचे प्रभागसमन्वयक कपिल सुधाकर देवाडकर यांची बदली यवतमाळ येथे करण्यात आलेली आहे. देवाडकर हे २०२५ पर्यंत कार्यरत होते. त्यांनी प्रभागसमन्वय म्हणुन उत्कृष्ठ कार्य केलेले आहे. आमच्या भरारी प्रभागसमन्वयक साठी त्याची खुप आवश्यकता आहे. तेव्हा देवाडकर यांची बदली रद्द करावी अशी मागणी उमेदच्या भरारी महिला प्रभागसंघ विसोरा – सावंगीच्या महिलांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांचेकडे केलेली आहे.
निवेदन देतांना वर्षाताई खुशाल कांबळे अध्यक्ष उन्नती , सुनिता सुरेश कांबळे सचिव , कला सुर्यभान ठाकरे कोषाध्यक्ष , अनुराधा कल्पेश घोरमोडे अध्यक्षा निर्मळ , भारती भालचंद्र ढोरे सचिव खुमादेवी कमलाकर निकोडे कोषाध्यक्ष रंजना हरिभाऊ मिसार उन्नती , शितल सुधारक पिलारे निर्मळ पिंगला मनोहर मिसार ICRP जागृती गुरुदास आत्राम वनश्री नंदकिशोर ढोरे वैशाली प्रफुल नागतोडे सरिता नरेंद्र बोदेंले जयश्री राजकुमार कावळे रजनी विकास मिसार बॅक सखी शारदा हिरालाल डुंले पशुसखी सचिता सुभाष मिसार आदि सहीत बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.

