संपादक प्रा. मुनिश्वर बोरकर गडचिरोली
गडचिरोली:-महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती जिल्हा शाखा गडचिरोली चे वतीने दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर दि. १६ व १७ ऑगष्ट २०२५ रोज शनिवार रविवारला गाणली हॉल गडचिरोली येथे आयोजीत करण्यात आलेले आहे.
प्रशिक्षण शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक म्हणुन नंदिनी जाधव पुणे , मिलिंद देशमुख पुणे , सम्राट हटकर नांदेड , वंदना शिंदे मुंबई , ॲड. वडगावकर उस्मानाबाद , रामभाऊ डोंगरे नागपुर आदि लाभणार आहेत.>गडचिरोली जिल्हयाच्या कार्यकर्त्यांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीची ओळख , जादुटोणा विरोधी कार्यक्रम , समितीची चतुः सुत्री कसे काम करते आता पर्यंत केलेली कामे आदि विषयावर मार्गदर्शन होणार असुन शिबिरातील दोन्ही दिवश चहा , नास्ता ,जेवण व राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तरी प्रशिक्षण शिबिरास ईच्छुकांनी संयोजक प्रा. मुनिश्वर बोरकर ९४२१७३४७९२ संपर्क साधावा.

