संपादक मुनिश्वर बोरकर
9421734792
गडचिरोली:- राज्य शासनाकडून नोंदणीकृत । कामगारांना गृहपयोगी वस्तुचे वाटप (पेटी) दिल्या जाते. सदर पेट्याचे वाटप चार – पाच तालुक्यातील कामगारासाठी चामोर्शी येथे कार्यालय आहे. गेल्या १५ दिवसापासून पेटयाचे वाटप होत आहे. तालुका व्हाईस पेट्याचे वाटप करावे असे माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी बांधकाम कामगार अधिकाऱ्यांना सांगितले
त्याप्रमाणे आज दि १५ मार्च गडचिरोली तालुक्यासाठी वाटपाचा दिवश होता त्यामुळे गडचिरोली तालुक्यातील कामगार आज दिनांक १५ मार्च ला ३५ कि.मी चा प्रवास करून पाहटेस नंबर लावला , बघता बघता कामगारांची गर्दी वाढली अन👀
👉लिंक फेल झाली असे अधिकाऱ्यांनी सांगीतले. वाटप करणारे कॅम्प मधील कर्मचारी गावाकडे गेले. पेट्या वाटपाच्या कामाला आता लिंक सुरु होइपर्यंत स्थगिती देण्यात आली. उन्हातान्हात उभे असलेले कामगार मात्र खाली हात गावी परतले. तर बांधकाम कामगार योजनेचे कर्मचारी सुद्धा घरी गेलेत. एवढा त्रास मात्र कामगारांना सहन करावा लागला. आता पेटी मिळण्यासाठी चातकाप्रमाणे वाट बघावी लागणार आहे.

