संपादक प्रा. मुनिश्वर बोरकर गडचिरोली
पवनी :-शिक्षण विस्तार अधिकारी वासुदेव अमृतराव नान्हे हे पं.स पवनी येथुन सेवानिवृत्त झाले. त्यांचा सत्कार जि.प डिजिटल पब्लिक स्कुल भुयार येथे सौ. मंगला बाळबुधे सदस्या प.स पवनी यांच्या अध्यक्षतेखाली तर कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष सौ. संगिता नवघरे सदस्या जि.प भंडारा हे होते. प्रमुख अतिथी म्हणुन संजकुमार वासनिक पवनी ,संदीप आटमांडे अध्यक्ष शा. व्य. स. भुयार ,मनोज चिचघरे पत्रकार भुयार ,मेघराज जोगवे ग्रामपंचायत सदस्य भुयार.
अविनाश वाघमारे सदस्य भुयार
प्रकाश अलोणे सदस्य शा. व्य. स. भुयार आदि लाभले होते.या प्रसंगी प.स सदस्य मंगला बाळबुधे म्हणाल्या की शिक्षण विस्तार अधिकारी नान्हे यांनी आपल्या सेवाकाळात योग्य कार्य केले म्हणुन आज त्यांचा सत्कार होत आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. मुरारी कढव मुख्याध्यापक आमगाव यांनी केले.तर दिलीप वैद्य मुख्याध्यापक काकेपार यांनी वासुदेव नान्हे यांचा जीवन परिचय करून दिला.कार्यक्रम सूत्रसंचालन हिरालाल वाकडे व सौ. योगिता ताजने यांनी केले. कार्यक्रमास भुयार केंद्रातील सर्व मुख्याध्यापक , शिक्षक युवा प्रशिक्षनार्थी , सेवानिवृत्त शिक्षक व विद्यार्थी बहुसंख्येनी उपस्थित होते.आभारप्रदर्शन पी. एम. भुरे यांनी केले.

